माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना

| Updated on: Feb 20, 2022 | 2:19 PM

अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी पद्धतीनं चौकशी करताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली.

माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us on

औरंगाबादः प्रियकरासोबत संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या लेकराचाच खून करण्याइतपत मातृत्व घसरू शकतं, याची कल्पनाही करू शकत नाही. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) वैजापूरमध्ये (Vaijapur murder) अशी घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील खंडाळा  (Khandala)इथं माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ऐकून अवघा तालुकाच हादरला आहे. विशेष म्हणजे मुलाचा खून केल्यानंतर तो गायब झाल्याची तक्रारही याच मातेनं पोलिसात केली होती. या प्रकरणी पोलिसांना आधीपासूनच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनही तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही.

वैजापूरात काय घडली घटना?

वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारातील जंगलातल्या गरीत 17 फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळला. पोलिसांनी डॉक्टरांना बोलावून कुजलेल्या या मृतदेहाचं जागेवरच शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर तो मृतदेह तलवाडा शिवारातील गट नंबर 252 मधील शेतात पुरून टाकला होता. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटावी, यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली होती. दरम्यान, वैजापूर ठाण्यात संगीता बागूल या महिलेने 11 फेब्रुवारी रोजी तिचा मुलगा सार्थक याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. वैजापूर पोलिसांचे एक पथक या प्रकरणी शिरूर येथे गेले होते. तेव्हा जंगलात सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांना बोलावून घेण्यात आले.

बिंग फुटताच आरोपीने केले विषप्राशन

या प्रकरणी पोलिसांना आधीपासूनच मुलाच्या आईवर संशय होता. मुलाचे प्रेत पाहूनही तिला रडू आले नाही. तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करताना तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःखाची भावना पोलिसांना जाणवली नाही. त्यामुळे संगीता बागूल हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी पद्धतीनं चौकशी करताच तिनं गुन्ह्याची कबुली दिली. सार्थकची आई संगीता बागूल हिचे गावातीलच साहेबराव पवार याच्याशी प्रेमसंबंध होते. हे संबंध सार्थक याला समजले होते. त्यामुळे यात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा काटा काढण्यासाठी दोघांनी खुनाचा कट रचल्याची कबुली आईनं दिली. पोलिसांना सार्थकचा मृतदेह सापडताच, या प्रकरणातील दुसरा आरोपी साहेबराव पवार यानं विषप्राशन केलं. त्याच्यावर सद्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

नारायण राणे यांच्या मालवण चिवला बीचवरील ‘निलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश, राणे-शिवसेना संघर्ष वाढणार?

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral