औरंगाबादकरांनो, ट्रॅफिकचा नियम मोडलाय का? तीन दिवसात फटाफट ई-चालान भरा, अन्यथा कोर्टात हजर व्हा!

| Updated on: Sep 21, 2021 | 6:28 PM

शहरातील 17,261 वाहनधारकांनी अद्याप अनपेड ई चलान तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही. अशा वाहन धारकांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान वाहन धारकांनी अनपेड ई चालान भरणे आवश्यक आहे.

औरंगाबादकरांनो, ट्रॅफिकचा नियम मोडलाय का? तीन दिवसात फटाफट ई-चालान भरा, अन्यथा कोर्टात हजर व्हा!
ई-चालानचा भरणा न केलेल्या वाहनधारकांना फक्त तीन दिवसांची मुदत
Follow us on

औरंगाबाद: शहरातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक शाखेतर्फे ई-चालान (E-Challan Systeme) प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यानुसार शहरातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंडाचे मॅसेज पाठवले जातात. या ई चालान प्रणालीद्वारे कारवाईत अनपेड ई-चालान असलेल्या वाहन धारकांना एसएमएस द्वारे सदर चालानची तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. परंतु 17 हजारांपेक्षा वाहन धारकांनी अद्याप ही दंडापायी असलेली रक्कम भरलेली नसल्याचे समोर आले आहे.

17,261 वाहनधारकांनी रक्कम भरलेली नाही

शहरातील 17,261 वाहनधारकांनी अद्याप अनपेड ई चलान तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही. अशा वाहन धारकांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वाहतूक, अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ई चालान भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसारचा अपडेटेड संदेश वाहनधारकांना पाठवण्यात आला आहे. 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान वाहन धारकांनी अनपेड ई चालान भरणे आवश्यक आहे.

अन्यथा कोर्टासमोर हजेरी लावा

महाराष्ट्र वाहतूक महासंचलनालयामार्फत दिलेल्या मुदत वाढीत वाहनधारकांनी ई चालान भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास वाहनधारकांना प्राप्त झालेल्या संदेशांनुसार 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा व सत्र न्यालायलय, औरंगाबाद येथे लोक अदालतमध्ये हजर रहावे लागणार आहे.

ई-चालान कोणत्या प्रकारे भरू शकणार?

  • वाहतूक शाखेचे 05 कार्यालये आहेत. तेथे रोख स्वरुपात ही रक्कम भरता येईल. किंवा शहरात मुख्य रोडवर विविध पॉइंटवर हजर असलेले वाहतूक पोलीस अंमलदार, अधिकारी यांच्याकडे भरणा करू शकता.
  •  डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड स्वरुपात भरता येईल.
  • पेटीएम अॅपमध्ये E-Challan वर जाऊन दंडाची रक्कम भरता येईल.
  • चालन केल्यानंतर समोरील व्यक्तीला गेलेल्या मेसेजमधील लिंकवर टच करून दंडाचा भरणा करता येतो.
  • महाट्रॅफिक अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून दंडाचा भरणा करता येतो.
  • mahatrasfficechallan.gov.in या वेबसाइटवर दंडाचा भरणा करता येतो

इतर बातम्या- 

आधी बेस्ट फ्रेंडची रिक्वेस्ट, मग अश्लील व्हिडिओ अन् चॅटिंग, अखेर औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकला

लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड