Aurangabad | औरंगबादच्या नव्या पाइपलाइनचे काम कुठवर? मुख्य जलवाहिनीसाठीचे पाइप कधी अंथरणार?

| Updated on: May 04, 2022 | 6:22 PM

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात मोठे जायकवाडी धरण असूनही केवळ वितरण व्यवस्था योग्य नसल्यामुळे अनेक वर्षांपासून औरंगबादकरांना पाण्यासाठी चार ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे

Aurangabad | औरंगबादच्या नव्या पाइपलाइनचे काम कुठवर? मुख्य जलवाहिनीसाठीचे पाइप कधी अंथरणार?
पुढील आठवड्यात मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबादः शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर औरंगाबादकरांचं बारकाईनं लक्ष आहे. शहरातील (Aurangabad city) विविध भागात अजूनही चार ते सात दिवसांनी पाणी वितरीत केलं जातं. राज्यात सर्वाधिक पाणी पट्टी भरूनही औरंगाबादकरांना नळाच्या (water tap) पाण्यासाठी आठवडाभराची वाट पहावी लागते. त्यातही शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी पाइपलाइन अत्यंत जीर्णावस्थेत असल्याने ती वारंवार नादुरुस्त होते. त्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचं वेळापत्रकही बदलतं.आता नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम कधी पूर्ण होणार याकडे औरंगाबादकरांचं लक्ष लागलं आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. याच्या पाइपची निर्मिती नक्षत्रवाडी येथील कारखान्यात सुरु आहे. पाइप निर्मितीमधील सर्व पातळ्यांवरील चाचण्या आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात पाइपला कोटिंग करून हे पाइप प्रत्यक्ष अंथरण्यासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे.

थर्ड पार्टी टेस्ट पूर्ण

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला पाणीपुरवठा योजनेचे काम मिळाले आहे. कंपनीच्या कारखान्यात या पाइप निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे. याच कंपनीतील अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, दररोज 55 मीटर पाइप तयार कऱण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत तीनशे लांबीचे पाइप तयार झाले आहेत. पाइपचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणाऱ्या एजन्सीने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. पाइपचे रेडिओग्राफीचे इन्स्पेक्शन पूर्ण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल मिळताच पाइपचे कोटिंग सुरु केले जाईल. त्यानंतर कोटिंग केलेले पाइप कंपनीबारे काढले जातील. हे पाइप दोन दिवसात जायकवाडीला पाठवण्यात येतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नव्या जलवाहिनीच्या प्रतीक्षेत औरंगाबादकर

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात मोठे जायकवाडी धरण असूनही केवळ वितरण व्यवस्था योग्य नसल्यामुळे अनेक वर्षांपासून औरंगबादकरांना पाण्यासाठी चार ते सात दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे औरंगाबादचे नागरिक आता संतप्त आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता आहे. शहरातील नव्या जलवाहिनीचे काम वेगाने होईल असा अंदाज आहे. सध्या तरी जायकवाडी येथे कंपनीकडून पाइप टाकण्यासाठी तयारी सुरु करण्यात आळी आहे. जायकवाडीच्या ज्या भागातून जुनी 1400 मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याच भागातून नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु केले जाणार आहे.