औंरगाबद: राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे ज्या वेगाने वाढतायत, तोच वेग औरंगाबादमध्येही (Aurangabad corona) दिसून येत आहे. औरंगाबादचा शुक्रवारचा पॉझिटिव्हिटी रेट 6.29 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच शहरातील 10 रुग्णांची तपासणी केली असता, त्यापैकी 6 रुग्णांना कोव्हिडचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात 151 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरात समूह संसर्ग होऊ नये, यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केली जात आहे.
शहरातील पॉझिटिव्हिटी रेट आठ दिवसात शून्यावरून सहा टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
31 डिसेंबर- 0.91
1 जानेवारी- 0.73
02 जानेवारी-1.34
03 जानेवारी- 1.21
04 जानेवारी-3.76
05 जानेवारी- 4.23
06 जानेवारी- 5.28
07 जानेवारी-6.29
– महापालिकेने 750 ऑक्सिजन बेड तयार केले आहेत.
– दुसऱ्या लाटेत 7 ते 8 हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार केले जातील, एवढी महापालिकेची क्षमता होती. आता ही क्षमता 10 हजार रुग्णांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
– सध्या शहरात 300 सक्रिय रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे.
– त्यामुळे किलेअर्क, एमआयटी कॉलेजची दोन वसतीगृहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह, देवगिरी महाविद्यालयाचे वसतीगृह, आयएचएम कॉलेजचे वसतीगृह या पाच ठिकाणी सोमवारपासून कोविड सेंटर्स सुरु केले जातील.
कोविडची रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णांमध्ये आढळून येणारी लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनीही गरज नसताना रुग्णाला दाखल करून घेतले तर कडक कारवाई केली जाईल. बेड विनाकारकण अडवून ठेवल्या जाणार नाहीत, अशी दक्षता घ्यावी. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून घ्यायला हवे, अशा सूचना खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या-