शेतकऱ्यांना मदत करा, भाजपची मागणी, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन

| Updated on: Oct 11, 2021 | 5:10 PM

लातूरमध्ये भाजपने 72 तासांचं अन्नत्याग अंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांना मदत करा, भाजपची मागणी, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन
latur bjp protest sambhaji patil nilangekar
Follow us on

लातूर : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये भाजपने 72 तासांचं अन्नत्याग अंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर ,आमदार रमेश कराड यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.

लातूरमध्ये भाजपचे 72 तास अन्नत्याग आंदोलन

मागील काही दिवसांपूर्वी नाशिक, उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली. नदी, नाले तसेच ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण खरीप हंगाम गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी भाजप म्हणजेच विरोधी पक्षाकडून केली जात आहे. लातूरमध्ये भाजप नेते संभाजी पटील निलंगेकर याच मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. त्यांनी 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात खुद्द संभाजी पाटील निलंगेकर तसेच आमदार रमेश कराड सहभागी झाले आहेत. तसेच या नेत्यांसोबत शेतकरी देखील उपस्थित आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

भाजपने लातूरमध्ये 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. पूर तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

दरम्यान, अजित पवार 10 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यवेळी त्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाष्य केले. वेळ आली तर कर्ज काढू पण मराठवाडा तसेच राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. “मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर क्षैत्रापैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे झाले असावे. पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू. पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे अजित पवार म्हणाले होते.

इतर बातम्या :

Video: ना कुठला मेकअप, ना भारी ड्रेस, एका स्मितहास्याने तिने नेटकऱ्यांची मनं जिंकली, पाहा पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ

मुंबईत अडीच, नागपुरात 8 तास, अनिल देशमुख यांच्या दोन शहरातील घरावर सीबीआयची धाड, तपासात काय सापडलं ?

आज वसुली चालू आहे की बंद? अमृता फडणवीसांचा खोचक सवाल, आता रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर

(bjp demand help to heavy rain affected farmers sambhaji patil nilangekar protest in latur for 72 hours)