मुंबई : कंत्राटदार नागरिकांची कामे करत नसल्याच्या तक्रारीत वारंवार वाढ होत आहे, अशा काम न करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती घेऊन त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या विनंतीनुसार पैठण विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामासंदर्भात आज आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. (Blacklist non-performing contractors; Nitin Raut’s instructions)
पैठण तालुक्यातील औरंगपूरवाडी, दरकवाडी येथील 33/11 के. व्ही. चे उपकेंद्र उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी भुमरे यांना देण्यात आली. पैठण तालुक्यातील प्रलंबित 48 ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम त्वरित करण्यात यावे, तसेच सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पैठण तालुक्यातील दरकवाडी, औरंगपूरवाडी, राहतगाव येथील 33/11 के. व्ही. चे उपकेंद्र उभारण्याच्या मागणीच्या प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना दिली. यावेळी प्रधान सचिव ऊर्जा दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक व संचलन संजय ताकसांडे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
Bhai Jagtap | गरज पडल्यास नितीन राऊतांचा राजीनामा मागू, भाई जगतापांचं मोठं विधान
इतर बातम्या
Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर
Blacklist non-performing contractors; Nitin Raut’s instructions