औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 36 दिवसानंतर मुख्यमंत्री आज पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. सकाळी पावणे दहाच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होईल.
मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानंतरचा मुख्यमंत्र्यांचा दूसरा औरंगाबाद दौरा आहे. गेल्या 17 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आज बरोबर 36 दिवसांनी मुख्यमंत्री औरंगाबादला येत आहेत. मागील औरंगाबाद दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. आज मुख्यमंत्री उद्घाटनानंतरच्या भाषणात काय बोलणार, याकडे लक्ष असेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सकाळी 9 च्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आगमन होईल. त्याच पार्श्वभूमीवर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावरच मुख्यमंत्र्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे.
०८.०० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने सांताक्रूजकडे प्रयाण
०८.१० वा. छत्रपती शिवाजी.महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रूज येथे आगमन
०८.१५ वा. विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
०९.०५ वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन
०९.१० वा. मोटारीने मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानी विस्तारीत इमारत, सिडकोकडे प्रयाण मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची विस्तारीत इमारत, सिडको येथे आगमन व राखीव
०९.२० वा. न्या. एन.व्ही. रमण्णा, भारताचे मुख्य न्यायाधीश यांचे आगमन
०९.४५- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं उद्घाटन
(CM Uddhav Thackeray Visit Aurangabad Inauguration of Aurangabad Bench of Mumbai High Court New Building live Updates)
हे ही वाचा :