निर्बंध सिथिलीकरणानंतर औरंगाबादेत बाजारपेठांमध्ये चैतन्य, जीम पूर्ण क्षमतेने सुरु

| Updated on: Aug 03, 2021 | 11:19 PM

कोरोना प्रतिबंधक नियम शिथील केल्यानंतर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चैतन्य पाहायला मिळत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

निर्बंध सिथिलीकरणानंतर औरंगाबादेत बाजारपेठांमध्ये चैतन्य, जीम पूर्ण क्षमतेने सुरु
AURANGABAD
Follow us on

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक नियम शिथील केल्यानंतर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चैतन्य पाहायला मिळत आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. निर्बंध काही प्रमाणात हटवल्यामुळे बाजारपेठांमध्ये लोक गर्दी करत आहेत. हॉटेल, कपडे, स्टेशनरी अशा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे येथील व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (Corona rule relaxed markets selling and purchasing increased in Aurangabad)

दुकानं, शॉपिंग मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी 

औरंगाबादेत यापूर्वी सायंकाळी चारनंतर सर्व दुकाने बंद करावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील केले आहेत. याच निर्बंध शिथिलीकरणामुळे येथे दुकाने जास्त वेळ सुरु ठेवता येत आहेत. नव्या नियमावलीनुसार सर्व प्रकारची दुकानं, शॉपिंग मॉल तसेच इतर दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमांचे व्यापाऱ्यांकडून स्वागत

मागील कित्येक महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे व्यापारी तसेच उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. मोठे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे दुकाने जास्त वेळ चालू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गाकडून केली जात होती. त्यानंतर आता नव्या नियमावलीमुळे औरंगाबादेतील काही नियम शिथील करण्यात आले आहेत. दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरु ठेवता येत असल्यामुळे येथील व्यापारी वर्गात समाधान आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे व्यापाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.

जीम पूर्ण क्षमतेने सुरु

औरंगाबाद शहरातील जीम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 50 टक्के क्षमतेने आणि अत्यल्प वेळेत सुरू असलेल्या जीम पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. जीम सुरु झाल्यामुळे जीम प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना नियम पाळणे महत्वाचे आहेच. मात्र, नियमांबरोबरच जीम तसेच व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता नियमित व्यायाम करता येणार असल्यामुळे जीमप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या :

औरंगाबाद ते शिर्डी प्रवास फक्त सव्वा तासांचा होणार, नव्या रेल्वे मार्गासाठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु

Video | औरंगाबाद पंचायत समितीत तुफान राडा, काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भाजप सभापतीला मारहाण

जिल्हा शल्य चिकित्सकाचा थाटात निरोप समारंभ, कोरोना नियमांना हरताळ, औरंगाबाद प्रशासन कारवाई करणार ?

(Corona rule relaxed markets selling and purchasing increased in Aurangabad)