औरंगाबादः कोरोना लसीकरण मोहिमेत सक्रियतेने सहभाग नोंदवणाऱ्या आरोग्य सेविकेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. वैशाली टाक (45) असे मृत आरोग्य सेविकेचे (Health worker) नाव असून त्या मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी होत्या. सोमवारी सकाळली कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे आरोग्य विभागासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
वैशाली टाक असे या मृत आरोग्यसेविकेचे नाव असून त्या मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी होत्या. 2008 पासून त्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. तेव्हापासून त्या वैजापूरमध्येच रहात होत्या. सोमवारी सकाळी 10 वाजता त्या लसीकरण करण्यासाठी रुग्णालयात हजर झाल्या. परंतु अचानक त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी ही माहिती
कोरोना काळात मागील दोन वर्षात वैशाली टाक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे या परिसरात त्या कोरोना योद्धा म्हणून ओळखल्या जात होत्या. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील कापूसवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका भारती माळी (51) यांचा दुचाकीवरून पडून अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर लगेच टाक यांच्या मृत्युमुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मोठा धक्का आहे.
इतर बातम्या-