Aurangabad: सायबर चालाखी, एनी डेस्कचा वापर करून माहिती घेतली, बँक खाते साफ, 19 रुपयेही शिल्लक ठेवले नाहीत

| Updated on: Nov 16, 2021 | 11:26 AM

एनी डेस्कवरून एटीएमचा असलेला सोळा अंकी नंबरही भामट्याने मागून घेतला. काही वेळातच खात्यातून चार हजार रुपये कमी झाले. त्यानंतर थोड्या वेळाने 40 हजार रुपये गायब झाले. शेवटी केवळ 19 रुपये शिल्लक होते, तेसुद्धा भामट्याने सोडले नाहीत.

Aurangabad: सायबर चालाखी, एनी डेस्कचा वापर करून माहिती घेतली, बँक खाते साफ, 19 रुपयेही शिल्लक ठेवले नाहीत
Cyber crime,
Follow us on

औरंगाबादः शहरातील औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यावर सायबर चोराने (Cyber crime) असा काही डल्ला मारला की आपण लुटले जात आहोत, याची कल्पनात कामगाराला आली नाही. अगदी सहजपणे कामगाराने या चोराला माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने पैसे गायब होऊ लागले. कामगाराच्या खात्यातून 40 हजार रुपये या भामट्याने लाटले. अखेर खात्यात 19 रुपये शिल्लक होते, तेसुद्धा चोरट्याने शेवटच्या टप्प्यात गायब केले. सायबर पोलीस (Aurangabad cyber police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कस्टमर केअरला फोन केला अन् ट्रॅप झाला…

शहरातील सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका कामगाराचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. त्यातून सर्व्हिस चार्जचे 45 रुपये कापण्यात आले. हे पैसे का कापण्यात आले, हे विचारण्यासाठी कामगाराने गुगलवर सर्च करून एसबीआयच्या कस्टमर केअरचा नंबर मिळवला. त्या नंबरवर फोन केला, मात्र संभाषण झाले नाही. काही वेळाने कामगाराला फोन आला. एसबीआयमधून बोलत असल्याचे भामट्याने सांगितले. कामगाराने 45 रुपये कपात झाल्याचे सांगितले.

एनी डेस्क डाऊनलोड करायला सांगितले…

कामगाराला सायबर चोराने फोन केला. पैसे मिळवायचे असतील तर ‘एनी डेस्क’ नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. कामगाराने तत्काळ अॅप डाऊनलोड केले. अॅपमध्ये खात्याची माहिती भरण्यास सांगितले. कामगाराने तेसुद्धा केले. एटीएमचा असलेला सोळा अंकी नंबरही भामट्याने मागून घेतला. काही वेळातच खात्यातून चार हजार रुपये कमी झाले. त्यानंतर थोड्या वेळाने 40 हजार रुपये गायब झाले. शेवटी केवळ 19 रुपये शिल्लक होते, तेसुद्धा भामट्याने सोडले नाहीत.

अनोळखी ठिकाणी माहिती भरू नका!

दरम्यान या चोरीची माहिती कामगाराने शङर यासहर गुन्हे शाळेला सांगितली. पोलीस भामट्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोणतीही बँक खातेधारकाची वैयक्तिक माहिती, फोन नंबर, पासवर्ड, ईमेलची माहिती मोबाइल फोनसह इतर कोणत्याही साधनाद्वारे विचारत नाही. आपल्या खात्याचे नंबर पासवर्डसह कोणतीच माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये, असे आवाहान औरंगाबादच्या सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी केले आहे.

इतर बातम्या-

Raisin Water : मनुक्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!  

साहित्य संमेलनात राजकीय राबता, समारोपाला पवार, मुख्यमंत्रीही लावणार हजेरी; उद्घाटक मात्र ठरेना!