औरंगाबादः जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Damege to crops) मोठे नुकसान झाले. असंख्य शेतकऱ्यांची खरीप पिके वाहून गेली. यासाठी राज्य सरकारकडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial compensation) जाहीर झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) याचे वितरणही सुरु झाले आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणे सुरु झाले आहे. मागील दोन दिवसात 37 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 कोटी 53 लाख 49 हजार 462 रुपये जमा झाले आहेत. अजूनही 6 लाख 66 हजार 900 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पुढील दोन दिवसात उर्वरीत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या 524655.71 हेक्टरांवरील खरीपाच्या पिकांना नुकसान झाले. तसेच शेकडो एकर शेती पाण्यासोबत खरवडून निघाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही हातातून गेला आहे. अशा शेतकऱ्यांना एकाच वर्षात दुहेरी नुकसान भोगावे लागत आहे. शासनाने पीक नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करावे, असे जाहीर केले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील दोन दिवसात 37 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 कोटी 53 लाख 49 हजार 462 रुपये जमा झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील 9 पैकी वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव या तीन तालुक्यांतच पीक नुकसानीचे अनुदान वाटप सुरु झाले आहके. तर सहा तालुक्यांतील 7 तहसील कार्यालयांमध्ये अद्याप अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही. यात अप्पर औरंगाबाद तहसील, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद या तहसील कार्यालयांचा समावेश आहे.
इतर बातम्या