औरंगाबाद घाटी रुग्णालयातील 250 डॉक्टर सामूहिक रजेवर, काय आहे नेमके कारण?

| Updated on: Feb 05, 2022 | 5:03 PM

शनिवारी बाह्य व आंतररुग्ण विभागात कोणतीही सेवा वैद्यकीय शिक्षक देणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट करून अडीचशे डॉक्टर रजेवर जात असल्याचे निवेदन दिले होते.

औरंगाबाद घाटी रुग्णालयातील 250 डॉक्टर सामूहिक रजेवर, काय आहे नेमके कारण?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः शहरातील घाटी रुग्णालयातील (Ghati Hospital) सुमारे 250 डॉक्टर आज शनिवारी सामुहिक रजेवर गेले. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत वैद्यकीय शिक्षण सचिवांना भेटीसाठी गेले होते. तेथे त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा निषेध म्हणून डॉक्टरांनी (Doctors) सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील या घटनेच्या निषेधार्थ एमएसएमटीतर्फे (MSMT) शनिवारी घाटीतील अडीचशे डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जात असल्याची पूर्वसूचना घाटी प्रशासनाला दिली होती. वैद्यकीय शिक्षकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत शुक्रवारी घोषणाबाजी केली. शनिवारी बाह्य व आंतररुग्ण विभागात कोणतीही सेवा वैद्यकीय शिक्षक देणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट करून अडीचशे डॉक्टर रजेवर जात असल्याचे निवेदन दिले होते.

डॉक्टरांचं म्हणणं काय आहे?

काही प्रलंबित मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याने सचिवांची भेट घेण्यासाठी आणि सकारात्मक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबईत गेले होते. मात्र या ठिकाणी मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संघटना संतप्त झाली आहे. प्रशासनाकडून डॉक्टरांना मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध त्यांनी निषेध केला. तसेच शनिवारी ओपीडीमध्ये सेवा दिली जाणार नाही, असे सांगत सामूहिक रजा टाकली. या सामूहिक रजेच्या आंदोलनाची पूर्वसूचना व मागण्यांचे निवेदन संघटना अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांना दिले. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.

नियोजित शस्त्रक्रिया होणार नाहीत

वैद्यकीय शिक्षकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत शुक्रवारी घोषणाबाजी केली. शनिवारी बाह्य व आंतररुग्ण विभागात कोणतीही सेवा वैद्यकीय शिक्षक देणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट करून अडीचशे डॉक्टर रजेवर जात असल्याचे निवेदन दिले होते.

कोणत्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न?

टर्शरी, रेफरल केअर, शिक्षण व संशोधनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये असताना सार्वजनिक आरोग्य सेवेचे आरोग्य केंद्र, ग्रामीण जिल्हा रुग्णालयांचे कंबरडे मोडल्याने सर्व भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये पेलत आहेत. त्यातही रिक्त पदे, अपुरा निधी, अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांसह मानद डॉक्टरांद्वारे गाडा हाकला जात आहे. या प्रश्नांविरोधात लढण्याचा निर्धार डॉक्टरांच्या वतीने करण्यात आला.

इतर बातम्या-

Fruad : सोलापूरात फट्टे घोटाळ्याची चर्चा तर पंढरपूरात कट्टे, काय आहे नेमका घोळ? तुमची तर फसवणूक नाही?

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात, “कार उद्ध्वस्त झाली, जीव वाचला” अपघातानंतर भावूक पोस्ट