औरंगाबादः राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही ऑनलाइन परीक्षेची तयारी सुरु केली आहे. विद्यापीठातील पदवीची परीक्षा 8 फेब्रुवारी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा 16 फेब्रुवारीपासून ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सुमारे चार लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा आधी ऑफलाइन पद्धतीने घेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑफलाइन तासिकाही बंद करण्याची घोषणा केली. तसेच सत्र परीक्षाही ऑनलाइन घेण्याच्या सूचना केल्या. याकरिता सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलुगुरूंची आढावा बैठक घेतली होती. यात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेस्तव परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता परीक्षाही ऑनलाइनच घेतल्या जातील. मागील वर्षी विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेतील सदोष निकालाचे प्रकरण गाजले होतके. या प्रकरणी परीक्षा संचालक डॉ. योगेश पाटील यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता यावर्षी पुन्हा परीक्षा ऑनलाइनच घ्याव्या लागणार आहेत, त्यामुळे याचे काटेकोर नियोजन केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर बातम्या-