औरंगाबादः MIM मधून (Aurangabad MIM) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दोन नगरसेवकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे नगरसेवक (Aurangabad NCP) दाखल झाले होते. नगरसेवकांच्या गुन्हेगारी कारवाया माहित असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. यामुळे पक्षाची बदनामी होऊ लागली, असा पक्ष सदस्यांचा आरोप होता.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय साळवे (Vijay Salve) यांनी या दोन नगरसेवकांची हकालपट्टी करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली होती.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये मागील दोन वर्षांपासून जोरदार इनकमिंग सुरु केले. 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय त्यांच्या वॉर्डात विकास करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मिळेल, असे अमिषही दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा निधी मिळाला नाही. त्यामुळे हे नगरसेवकदेखील निवडणुकीपर्यंत पक्षात टिकतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. तसेच त्यानंतर एमआयएमचे माजी नगरसेवक सय्यद मतीन आणि शेख जफर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.
पाच दिवसांपूर्वीच सय्यद मतीन यांच्या भावाच्या गाडीत नशेच्या गोळ्या आढळल्या. जफर हा सध्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हर्सूल कारागृहात आहे. या दोन्ही नगरसेवकाच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होत असल्याने दोघांचीही हकाल पट्टी करण्याची मागणी केली जात होती. अखेर वरिष्ठांनी ही कारवाई केली.
इतर बातम्या-