Aurangabad: बीएलओंना निवडणूक आयोगाच्या गरुड अ‍ॅपचे प्रशिक्षण, आता 3 हजार अधिकारी झाले स्मार्ट!

| Updated on: Oct 09, 2021 | 5:30 PM

या अ‍ॅपद्वारे बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात प्रभाग मतदान नोंदणी अधिकाऱ्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरूनच पोलिंग स्टेशनचे फोटो आणि लोकेशन इत्यादी माहिती अपलोड केली जाऊ शकते.

Aurangabad: बीएलओंना निवडणूक आयोगाच्या गरुड अ‍ॅपचे प्रशिक्षण, आता 3 हजार अधिकारी झाले स्मार्ट!
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद: मतदान प्रक्रियेतील सर्वात शेवटचा कर्मचारी म्हणजे प्रभाग मतदान नोंदणी अधिकारी किंवा  (Block Level Officer). मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध कामे आतापर्यंत या अधिकाऱ्याबीएलओमार्फत कागदावर केली जात होती. त्यानंतर त्याची संगणकात नोंद केली जात होती. मात्र आता या सर्व प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने मोबाइल अ‍ॅप (Garud App) विकसित केले आहे. गरुडा या अ‍ॅपमध्ये या सर्व नोंदी मतदान केंद्रावरच केल्या जातील. यासंबंधीचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यातील बीएलओ अर्थात प्रभाग मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना दिले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) 3 हजार बीएलओ आणि कर्मचाऱ्यांना नुकतेच हे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिली.

काय आहे गरुड अ‍ॅप?

भारतीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवरील ऑनलाइन मॅपिंगसाठी गरुड अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपद्वारे बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात प्रभाग मतदान नोंदणी अधिकाऱ्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरूनच पोलिंग स्टेशनचे फोटो आणि लोकेशन इत्यादी माहिती अपलोड केली जाऊ शकते. तसेच मतदान केंद्रासंबंधी इतर माहितीदेखील या अ‍ॅपवर पाहता येऊ शकते. या अ‍ॅपमध्ये बीएलओंना मोबाइलद्वारेच विविध कामे करता येतील. तसेच निवडणूक आयोगाला मतदान केंद्राच्या स्थितीचे वास्तविक आकलन होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 2806 बीएलओ आणि निवडणूक कर्मचारी अशा जवळपास 3000 कर्मचाऱ्यांना नुकतेच हे अ‍ॅप व ते चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

नागरिकांसाठी व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप

सामान्य नागरिकांनाही आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी निवडणूक आयोजाने व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप तयार केले आहे. त्यासाठी व्होटर हेल्पलाइन हे अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागते. यात स्वतःची नाव नोंदणी, नावातील दुरुस्ती, दुसऱ्या मतदार संघातील नाव ट्रान्सफर करता येते किंवा रद्दही करता येते. ही माहिती भरल्यानंतर ती ऑनलाइन पद्धतीनेच तहसीलदारांकडे जाते. रहिवाशी पत्त्यावरून मतदान केंद्र निश्चित होते. नोंदणी झाली किंवा रद्द झाली याबाबतचा मेसेज नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर येतो.

नोव्हेंबरनंतर नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा

विधानसभेची प्रारुप यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर होणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी हे अ‍ॅप तयार केलेले असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अॅपचा वापर करावा. कारण मतदार नोंदणीची प्रक्रिया वर्षभर सुरूच असते, अशी माहिती निवडणूक विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम यांनी दिली.

इतर बातम्या-

Pune municipal election : पुण्यात ठाकरे-पवार पॅटर्नची चर्चा, भाजपला रोखण्यासाठी मोठी रणनीती