औरंगाबाद: आंतराराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज पुन्हा एकदा सोन्याच्या (Gold rate) दरात घसरण झाली. चांदीनंही काहीशी घसरण अनुभवली. त्यामुळे औरंगाबाद शहरातील सोन्याच्या दरांवरही (Aurangabad city market) परिणाम झाला. औरंगाबादच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरातही 400 रुपयांच्या आसपास घट दिसून आली. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावातील हा उतरता आलेख आणखी किती काळ राहिल, सोन्याला चांगले दिवस कधी येतील, यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक (Investment advise) करणे योग्य ठरेल.
औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात सोन्याने पुन्हा 47 हजाराची पातळी सोडली आणि भाव खाली घसरले. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46,600 रुपये प्रति तोळा असे नोंदल्या गेले. काल हे दर 47, 000 रुपये प्रति तोळा असे होते. तर चांदीनंही असाच उतरता आलेख दर्शवला. औरंगाबादमध्ये आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 66,300 रुपये असल्याची माहिती, औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. अर्थात शेअर बाजारातील घडामोडींनुसार, दरांमध्ये दर मिनिटाला चढ-उतार होत असतो. तरीही दिवसभरातील सरासरी भावांची नोंद येथे देण्यात येते.
शेअर बाजार आणि सोन्याच्या दरांचे विरोधी गणित असते. सध्या शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली आहे. बाजारात स्थानिक वित्तीय संस्था आणि विदेशी वित्तीय संस्था या दोन्हींकडून चांगली गुंतवणूक झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार सध्या राबवत असलेल्या विविध योजनांमुळे गुंतवणूकदारांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवून उत्तम परतावे मिळत आहेत. परिणामी सोन्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. शेअर बाजारात जेव्हा अस्थिरता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. भारताप्रमाणेच अमेरिका, जपान, सिंगापूर मार्केटमध्येही शेअर बाजार तेजीत आहे.
बाजारात मागणी तसा पुरवठा होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानमुळे असुरक्षिततेचं वातावरण आहे. सोन्याचे हब समजल्या जाणाऱ्या दुबईतही सोन्याला मागणी कमी आहे. काही दिवसांनी दसरा आणि दिवाळीदरम्यान सोन्याला पुन्हा एकदा मागणी वाढू शकते. ,सामान्य नागरिकांप्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही या काळात सोन्याची मागणी वाढते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या काळात नागरिकांकडून विचार केला जातो. त्यामुळे दोन महिन्यांनी सोन्याचे दर वाढलेले दिसू शकतात, असा अंदाज LKP सिक्युरिटीज कंपनीचे उपाध्यक्ष विश्वनाथ बोदडे यांनी व्यक्त केला.
इतर बातम्या-
Gold Hallmarking: केंद्र सरकार दागिन्यांच्या हॉलमार्किंगचा ‘हा’ नियम पुन्हा बदलणार?