औरंगाबादः दिवाळीदरम्यान काही प्रमाणात घसरलेल्या सोन्याच्या भावांनी सध्या स्थिरता प्राप्त केलेली दिसत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दराने 48 हजारांची पातळी कायम ठेवली असल्याचे चित्र आहे. तर चांदीच्या दरांनीही 68 हजारांच्या पातळीवर स्थान मिळवलेले दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारांनुसार विविध शहरांमधील सोन्याचे दर खाली किंवा वर होत असतात. त्यामुळे औरंगाबादच्या दरांवरही याचा परिणाम होतो.
औरंगाबाद शहरात आज म्हणजेच बुधवारी 10 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. औरंगाबादमधील चांदीच्या दरात मात्र काहीशी घसरण झालेली दिसून आली. कालच्या पेक्षा 200 रुपयांनी चांदीचे भाव घसरले. एक किलो चांदीचे दर आज बुधवारी 67,800 रुपये प्रति किलो एवढे नोंदले गेल्याची माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली. 09 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये एवढे दिसून आले. 08 नोव्हेंबर रोजी सोमवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,000 रुपये असे दिसून आले.
तुळशीच्या लग्नानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होत आहे. त्यामुळे दिवाळीतील ग्राहकांची गर्दी ओसरली असली तरीही औरंगाबादच्या सराफा बाजारात आता लग्नासाठीच्या दागिन्यांची खरेदी होताना दिसत आहे. लग्नासाठीच्या खास वधूच्या पसंतीच्या दागिन्यांची ऑर्डर अनेकदा आधीपासूनच दिलेली असते. त्यानुसार सराफ दागिने घडवून देतात. तसेच शहरात विविध ब्रँडची सुवर्णदालने आल्याने रेडिमेड दागिने खरेदीकडेही महिलांचा जास्त ओढा असताना दिसून येत आहे.
इतर बातम्या-
टी-20 विश्वचषकात सेमीफायनलची पहिली लढत न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड#T20WorldCup2021 #EnglandVsNewZealand #Cricket Score pic.twitter.com/ZFKPju2Xju
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2021