औरंगाबाद: मागील आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरांनी (Gold-silver price) सलग चढणीचा आलेख दर्शवला आहे. सप्टेंबर महिन्यात विक्रमी निचांकी पातळी गाठल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मात्र सोने आणि चांदीचे भाव काहीशे वाढलेले दिसून येत आहेत. आता दिवाळीपर्यंत हे भाव वाढत राहतील आणि सोन्यात गुंतवणूक (Investment in gold) करणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. औरंगाबादच्या सराफा बाजारातही मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसून येत आहेत. बाजारात आता दिवाळी आणि लग्नसराईसाठी नागरिकांची खरेदीची लगबग दिसून येत आहे.
दरम्यान, औरंगाबादध्येही आज 22 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरांनी 200 रुपयांची वाढ घेतलेली दिसत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे झाले. 21 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 47300 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48,500 रुपये प्रति तोळा एवढा नोंदला गेला.
आज गुरुवारी एक किलो शुद्ध चांदीचा दर बुधवारच्या दरावरच स्थिर राहिला. तो 67,500 रुपये एवढा नोंदला गेला.
बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.
इतर बातम्या-
100 कोटींच्या उत्सवात कुठेय औरंगाबाद ? जिल्ह्यात 20 टक्केच नागरिकांचे दोन डोस, जागे व्हा, लस घ्या!
औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात योजनांची पुनर्बांधणी