Special Report : राज्यपाल कोश्यारींना नेमकं झालंय तरी काय?

| Updated on: Nov 19, 2022 | 8:59 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी, आपल्या वक्तव्यानं पुन्हा रोष निर्माण केलाय.

Special Report : राज्यपाल कोश्यारींना नेमकं झालंय तरी काय?
Follow us on

औरंगाबाद : एखादा सार्वजनिक मंच असला की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काही वादग्रस्त बोलून जातात. औरंगाबादला विद्यापीठातही त्यांनी तेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना कोश्यारींनी जुन्या काळातले आदर्श म्हटलंय. त्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले असून राज्यपालांना महाराष्ट्रातून काढण्याची मागणी केलीय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी, आपल्या वक्तव्यानं पुन्हा रोष निर्माण केलाय. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हटलंय. शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आणि सध्याच्या काळात नितीन गडकरी तरुणांचे आदर्श आहेत, असं राज्यपाल कोश्यारी म्हणालेत.

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी प्रदान समारंभाचा कार्यक्रम होता. त्यात कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरींनाही डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. पण गडकरींचं कौतुक करताना कोश्यारींनी शिवरायांनाच जुन्या काळातले आदर्श म्हणून वाद निर्माण केला.

हे सुद्धा वाचा

माजी खासदार संभाजी महाराज, संभाजी ब्रिगेड असो विरोधकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तर इकडे भाजपनंही राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यापासून दूरावा करत, शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलंय.

भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यानं रोष किंवा वाद निर्माण झाला असं नाही. याआधीही समर्थांना शिवरायांचे गुरु म्हणणं असो. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या लग्नावरुन केलेलं वक्तव्य की मग मुंबईत पैसेच राहणार नाही, अशी भावना दुखावणारी टीका राज्यपालांकडून झालीय.

सार्वजनिक कार्यक्रमात एखाद्याचं कौतुक हे स्वाभाविक आहे. पण ते कौतुक करताना इतरांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कराण छत्रपती शिवाजी महाराज हे आजही शक्ती आणि ऊजा देणारं महाराष्ट्राचं दैवत आहे.