Smart City औरंगाबादमध्ये मनपा उभारणार 11 अत्याधुनिक रुग्णालये, 40 कोटींचे बजेट!

| Updated on: Dec 02, 2021 | 3:32 PM

आरोग्य यंत्रणेवर सध्याच्या काळात येणारा ताण पाहता, औरंगाबाद महापालिका आगामी काळात शहरात आणखी 11 अत्याधुनिक रुग्णालये उभारणार, अशी योजना आखल्याचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले. यासाठीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Smart City औरंगाबादमध्ये मनपा उभारणार 11 अत्याधुनिक रुग्णालये, 40 कोटींचे बजेट!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः सध्या निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मबापालिका आणि स्मार्ट सिटी (Smart city) प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. घाटी रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी महापालिका (Aurangabad municipal corporation) शहरात आणखी 11 अत्याधुनिक रुग्णालये उभी करणार आहे. स्मार्ट सिटीची सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी यासंदर्भातील मनोदय व्यक्त केला. त्यानुसार शहरात विविध ठिकाणी जागांचा शोध सुरु आहे.

40 कोटींचे बजेट, आरोग्य व्यवस्था मजबुतीवर भर

शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी 40 कोटी रुपये खर्च करणार असल्याने मनपा प्रशासनाने सांगितले. या अंतर्गत आंबेडकर नगर, सिडको एन-2 कम्युनिटी सेंटरजवळ 10 कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. गजानन नगरात 2 कोटींचे एक रुग्णालय उभारण्यात येईल. तसेच सातारा देवळाई, ईटखेड्यात 3 रुग्णालये उभारली जातील. औरंगाबादमधील 14 आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहितीही मनपातर्फे देण्यात आली.

डीपीआर तयार करण्याच्या सूचना

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी 40 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या निधीतून मनपाची मोठी स्पेशलिस्ट रुग्णालये उभी राहतील. सध्या या संदर्भातील प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली असून मार्च 2022 मध्ये काम सुरु होईल, अशी अपेक्षा आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या-

Mahaparinirvan Din: काल आनंदराज आंबेडकरांचं चैत्यभूमीवर येण्याचं आवाहन, आज बाळासाहेब म्हणतात, टाळा!

Suresh Mhatre | शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस, पाचव्यांदा पक्षांतर, बाळ्या मामा म्हात्रे आता राष्ट्रवादीत