औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील (Heavy Rain in Aurangabad) जवळपास सर्वच भागांना नुकसान पोहोचले आहे. चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सर्वच कंपन्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. मनपाने (Aurangabad Municipal cororation) कर भरूनही ना चांगले रस्ते दिले ना सफाई केली, अशी तक्रार उद्योजक करत आहेत. आता इंडस्ट्रीतील अनेक युनिटमध्ये पाणी गेल्याने उद्योजकांना स्वतः यंत्रणा लावून हे पाणी काढावे लागत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये (MIDC Aurangabad) पाणी शिरल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष नारायण पवार (Narayan Pawar) यांनी दिली.
27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. उद्योग जगतालाही मोठा फटका बसला आहे. चिकलठाणा एमआयडीसीत 500 तर वाळूजमध्ये 800 हून अधिक युनिट आहेत. नारेगाव भागात रस्त्याचे काम झाले तेव्हा पुलाखाली असलेल्या पाठपमद्ये माती भरल्याने पाणी जाण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांत पाणी शिरले. मनपाने मध्यंतरी केलेली नालेसफाई नावालाच झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.
चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व कंपन्या महानगरपालिकेचा कर भरतात. पण येथील परिसराला महानगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे हा प्रकार या वर्षीचाच नानही. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला कर्मचारी लावून 4 तास पाणी उपसून काढावे लागत असल्याची तक्रार विजय लेकुरवाळे यांनी केली.
चिकलठाण्यात तुळजा ऑइल कंपनी आहे. हिंदुस्थान गॅस कंपनीच्या भिंतीच्या बाजूला नाला आहे. तो बंद झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. कंपनीतच गुडघाभर पाणी शिरल्याने येथील मशीनरी आणि साधन सामग्रीचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 1984 पासून हाच प्रकार सुरु आहे. मुसळधार पाऊस येताच, कंपनीत पाणी शिरते, अशी तक्रार अनिल कसबेकर यांनी केली.
इतर बातम्या-