औरंगाबादः जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील 53 व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. पैठण येथील नाथ महाराजांच्या वंशजांतर्फे रविवारी या लोकांचा सत्कार करण्यात आला. तसेच हिंदू धर्मात त्यांना जाहीर रित्या स्वीकृती देण्यात आली, अशी माहिती पैठण येथील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील महिला, पुरुष व बालक अशा 53 जणांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र काही दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला. शनिवारी दक्षिण काशीचे धर्मपीठ म्हणून ओळख असलेल्या पैठण येथे या लोकांचे हिंदू धर्मात घरवापसी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला.
दरम्यान ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर या लोकांना मूळ हिंदू धर्माची ओढ लागल्याने त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे 5 जानेवारी रोजीदेखील आणखी 65 महिला व पुरुष पैठण येथील कार्यक्रमात हिंदू धर्मात येतील, असी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.
इतर बातम्या-