Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!

| Updated on: Nov 11, 2021 | 1:05 PM

समीरचा मोबाइल अबुबकरकडे होता. त्यावर समीरच्या आईचे वारंवार फोन येत होते. तरीही अबुबकर मोबाइल देत नव्हता. याचा राग आल्याने तसेच जुन्या वादातून अबुबकरचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे त्याने दिली.

Crime: गुन्हेगाराची डोळे फोडून निर्घृण हत्या, मित्रानेच वादातून केला खून, औरंगाबादेत थरार!
आरोपी सय्यद समीर
Follow us on

औरंगाबादः शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा (Aurangabad murder) चाकूने वार करून, दोन्ही डोळे फोडून निर्घृण हत्या झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. जळगाव रोडवरील वोक्हार्ट चौकाजवळ सकाळी नऊच्या सुमारास ही भीषण घटना घडली. अबुबकर चाऊस असे मृताचे नाव असून त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी (Aurangabad police) याप्रकरणी आरोपी सय्यद समीर ऊर्फ स्टायलो सय्यद शौकत याला अटक केली आहे.

बुधवारी नागरिकांना दिसला रक्ताने माखलेला मृतदेह

बुधवारी सकाळी काही नागरिक नारेगावकडे जाताना त्यांना झुडपात रक्ताने माखलेली व्यक्ती पडल्याचे दिसले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तत्काळ हा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर अवघ्या दोन तासात एमआयडीसी सिडको पोलिसांनी मृताची ओळख पटवली.

मोबाइलवरून झाले वाद

आरोपी सय्यद समीरने पोलिसांजवळ या गुन्ह्याची कबूली दिली असून ही घटना कशी घडली, हेही सांगितले. मृत अबूबकर आणि आरोपी सय्यद समीरने चिश्तिया चौकातील एका बारमधून दारू विकत घेतली. त्यानंतर दोघे आंबेडकर परिसरात दारू पित बसले. यावेळी समीरचा मोबाइल अबुबकरकडे होता. त्यावर समीरच्या आईचे वारंवार फोन येत होते. तरीही अबुबकर मोबाइल देत नव्हता. याचा राग आल्याने तसेच जुन्या वादातून अबुबकरचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे त्याने दिली.

घराच्या पत्र्यावर सापडचा चाकू व रक्ताने माखलेले कपडे

उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपास करून आरोपी समीरला दुपारीच ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घराच्या पत्र्यावर चाकू आणि रक्ताने माखलेले कपडे सापडले. ते जप्त करून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळावरून आरोपीचा मोबाइलदेखील हस्तगत करण्यात आला.

इतर बातम्या-

औरंगाबादः 8 वर्षीय मुलीच्या आत्महत्येचे गूढ उकलले, पत्नी नांदायला येत नाही म्हणून बापानेच केली हत्या!

Fraud: सख्ख्या भावानेच 2 कोटी 11 लाखांना फसवले, सेवानिवृत्त अधीक्षकांचा आरोप, तिघांवर गुन्हा दाखल