औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad corporation election ) राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election commission ) सूचनांनुसार औरंगाबाद महानगरपालिकेने प्रशासकीय स्तरावर 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात 9 हजार 746 लोकसंख्येचा एक वॉर्ड राहणार आहे. एकूण 126 वॉर्डांपैकी 63 वॉर्ड महिलांसाठी (Reservation for women) राखीव राहणार आहेत.
औरंगाबादमधील महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. परंतु निवडणूक प्रक्रिया जैसे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. हे आदेश उठवण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले असल्याची माहिती उपायक्त संतोष टेंगळे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. प्रभागांची संख्या 42 असेल. निवडणुकीसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला जाईल. 26 हजार 315 ते 32 हजार 161 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. तर एका वॉर्डाची लोकसंख्या 9,746 असेल. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी होती. मात्र या मतदारांची संख्या 9 लाख 39 हजार 458 एवढी आहे. मात्र यंदा मतदारांच्या संख्येत 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लोकसंख्येच्या तुलनेत 60 ते 70 टक्के मतदार असतील.
इतर बातम्या-