उस्मनाबादः उस्मनाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (Osmanabad Tuljapur) तालुक्यातील फुलवाडी टोलनाक्यावर आज मनसे(MNS) नेत्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मनसे जिल्हाध्यक्ष (Prashant Navgire) आणि कार्यकर्त्यांनी हा टोलनाका फोडला. या महामार्गाचे काम अद्याप सुरु झाले नसून रस्त्यावरून जाणाऱ्या गरीब प्रवाशांकडून सक्तीने टोलवसुली केली जाते. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हजारो निरपराधांचा अपघातात जीव गेला असूनही कोणत्या अधिकाराखाली रस्ता बनवणारी कंपनी टोल वसूल करते, असा सवाल करत मनसेने या टोलनाक्याची नासधूस केली.
मनसेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी टोलनाका फोडण्याच्या आंदोलनात आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, नॅशनल हायवे क्रमांक 65 वरील हा सुमारे 100 किलोमीटरचा रस्ता प्रचंड खड्डेमय आहे. येथील उड्डाणपुले, सर्व्हिस रोड, व्हिलेज रोड आदी सर्व कामे अर्धवट आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. इथल्या दुभाजकांवर भले मोठे गवत वाढले आहे. यामुळे असंख्य प्रवाशांचे अपघात झाले आहेत. आतापर्यंत येथे 1000 ते 1200 नागरिकांचे प्राणही गेले आहेत, असे असतानाही रस्ते दुरुस्त करण्याऐवजी सक्तीची टोल वसुली सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, आदींकडे रस्ते बांधणाऱ्या कंपनीविरोधात अनेकदा तक्रार करूनही त्यांनी विनंतीला मान दिला नाही, असा आरोप नवगिरे यांनी केला. येथून जाणारे शेतकरी आणि नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्याकडून सक्तीने टोल वसूल केला जातो, याच कारणासाठी मनसेने हा धडा शिकवला, अशी प्रतिक्रिया नवगिरे यांनी यावेळी दिली. मात्र या हिंसक कृत्यानंतर नवगिरे यांच्यावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
इतर बातम्या-