औरंगाबाद: शहरातील पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel price) दरात दरात सप्टेंबर महिन्याअखेर आणखी वाढ झाली आहे. शहरात सध्या पेट्रोलचे दर 109.01 रुपये प्रति लिटीर तर डिझेलचे दर 98.81 रुपये प्रति लीटर असे झाले आहेत. सप्टेंबर महिन्यातील 21 दिवस पेट्रोलचे दर स्थिर होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात पेट्रोलच्या दरात 89 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या भाववाढीनेही नवीन विक्रम (Record price hike) स्थापन केला आहे.
औरंगाबाद शहरात 17 जुलै 2021 रोजी पेट्रोलचे दर 109.18 रुपयांपर्यंत पोहोचले होते. ही दरवाढ पेट्रोल विक्रीच्या इतिहासात सर्वात जास्त ठरली होती. त्यानंतर 21 ऑगस्ट पर्यंत पेट्रोलचे हे दर स्थिर होते. त्यानंतर 22 ऑगस्ट ते पाच सप्टेंबरच्या काळात पेट्रोलच्या किंमती उतरण्यास सुरुवात झाली. 6 सप्टेंबर रोजी पेट्रोलचे दर 108.60 रुपये एवढे नोंदले गेले. त्यानंतर पुन्हा दरवाढीचे सत्र सुरु झाले.
27 सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात 18 पैशांची वाढ झाली. तर 30 सप्टेंबरला 23 पैशांची वाढ झाली. या दोनच दिवसांत पेट्रोलच्या दरात 55 पैशांची वाढ झाल्यामुळे पेट्रोलच्या भाववाढीने 109 रुपये प्रतिलीटरचा दर पार केला आहे.
औरंगाबाद- 109.01, बीड- 108.74, हिंगोली 108.67, लातूर 108.72, नांदेड 109.97, उस्मानाबाद 108.03, परभणी 110.21, आणि जालना 108.87 रुपये प्रतिलीटर असे पेट्रोलचे भाव सध्या सुरु आहेत.
औरंगाबादेत डिझेल 98.81, बीड- 97.03, हिंगोली 96.98, लातूर 97.01, नांदेड 98.23, उस्मानाबाद 96.36, परभणी 98.43, आणि जालना 97.14 प्रती लीटर असे सध्या भाव आहेत.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत असल्याची माहिती स्थानिक पंप विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
इतर बातम्या-
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ