औरंगाबादसारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरालाही सात ते आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते, ही खेदाची बाब आहे, अशी खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी गुरुवारी यांनी गुरुवारी व्यक्त केली. राज्यपाल गुरुवारी औरंगाबाद शहरात (Aurangabad city) दुपारी दाखल झाले. विमानतळावर रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी त्यांचे स्वागत केले. सुभेदारी विश्रामगृगहात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सैनिकी विभाग, रेडक्रॉस, मानव विकास मिशन आणि मराठवाडा विकास मंडळाचा त्यांनी आढावा घेतला.
– जागतिक पर्यटनस्थळांमुळे औरंगाबाद शहराला महत्त्व आहे. अशा जागतिक ख्यातीच्या शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होणे खेदजनक असल्याची भावना राज्यपालांनी व्यक्त केली. येथील लोकप्रतिनिधी, सरकारमधील मंत्री काय करीत आहेत, त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे राज्यपाल म्हणाले.
– सध्या औरंगाबादेत गाजत असलेल्या घरकुल योजनेचा मुद्दाही राज्यपालांसमोर मांडण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेला जिल्हा आणि मनपा प्रशासनातील बेबनावामुळे जागा मिळत नसल्याने ही योजना रेंगाळली आहे.
– तसेच शहरात महिला अत्याचारात वाढ झाल्याची तक्रार भाजपचे आमदार सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, राजू शिंदे आदींनी निवेदनाद्वारे केली.
– तसेच शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम मंद गतीने सुरु असल्याची तक्रारही भाजपच्या वतीने करण्यात आली.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. विद्यापीठांच्या स्वायत्ततेला तिलांजली देणाऱ्या महाविकास आघाडीच्या विधेयकास मंजुरी देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली.
इतर बातम्या-