औरंगाबाद: नवरात्रीचा उत्सव आल्याने शहरातील (Navratri festival in Aurangabad) नागरिकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतोय. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या फैलावामुळे सर्व उत्सव घरातूनच साजरे करणाऱ्या औरंगाबादकरांना यंदा मात्र आपल्या लाडक्या श्रद्धापीठांना भेट देता येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशांनुसार, शहरातील सर्व मंदिरे (Temples in Aurangabad) गुरुवारपासून खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वात प्राचीन समजले जाणारे कर्णपुरा देवीचे मंदिरदेखील भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी येत्या 07 ऑक्टोबर पासून कर्णपूरा देवीचे (Karnpura Devi, Aurangabad) मंदिर 17 तास खुले राहणार आहे.
– घटस्थापनेपासून संपूर्ण नवरात्रोत्सवात भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार
– दर्शनाच्या रांगेत एक-एक मीटरच्या अंतरावर उभे रहावे लागणार
– सकाळी 5.30 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार
– मास्कशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक राजू दानवे यांनी दिली.
– जळगाव रोडवरील रेणुका माता मंदिरातही घटस्थापनेपासून भक्तांना दर्शनासाठी येण्याची परवानगी.
– सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत.
– स्वतंत्र मार्किंग करून एका वेळी पंधरा ते वीस जणांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जाईल.
– भक्तांना सुरक्षित अंतर ठेवून रांगेत उभे राहण्याची ताकिद
– सॅनिटायझरचा वापर तसेच मास्क लावूनच भक्तांना मंदिरात सोडले जाईल, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक दीपक पाठक यांनी दिली.
– हर्सूल परिसरातील हरसिद्धी माता मंदिरातही सर्वाधिक भक्त दर्शनासाठी येतात.
– एकाच वेळी ठराविक संख्येनेच भक्तांना मंदिराच्या गाभ्यात प्रवेश मिळेल, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
– मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना राज्य व स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
– मंदिर परिसरात मास्क वापरणे सर्वांसाठीच अनिवार्य आहे.
– नवरात्रीच्या उत्सवासाठी सातारा परिसरातील रेणूका माता मंदिरही सज्ज झाले आहे. भाविकांनी आपल्या व इतरांच्याा आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
– कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे कडेठाण येथे महाराष्ट्रातील एकमेव उपपीठ हे पैठण तालुक्यातील कडेठाण येथे आहे.
– नवरात्रोत्सवासाठी येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
– भाविकांनी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन केल्यास त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
इतर बातम्या –
Navratri 2021: घटस्थापना म्हणजे काय? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि सर्व काही