Latur VIDEO| ‘तुमच्यापुढं रेडा तरी संवेदनशील’, भाजप युवा मोर्चाची लातूरात निदर्शनं, पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

| Updated on: May 18, 2022 | 3:27 PM

येत्या काही दिवसात लातूर महापालिकेची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेससाठी हा प्रश्न डोकेदुखी ठरणार आहे.

Latur VIDEO| तुमच्यापुढं रेडा तरी संवेदनशील, भाजप युवा मोर्चाची लातूरात निदर्शनं, पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लातूरः लातूरमधील अनेक भागात पुन्हा एकदा नळांना पिवळे (Yellow water) आणि गढूळ पाणी (Impure water) येत आहेत. यामुळे नागरिक संतप्त असून भाजप युवा मोर्चाने याच मुद्द्यावरून तीव्र आंदोलन केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी (BJP Youth front) आज महापालिकेवर थेड रेडाच नेला. नागरिकांना सोयी सुविधा न देता केवळ सत्तेचा उपभोग घेणाऱ्यांविरोधात भाजपने घोषणाबाजी केली. तसेच जनतेच्या हाल अपेष्टा सत्ताधाऱ्यांना अजिबात जाणवत नाहीत. महापौर, प्रशासन आणि पालकमंत्री या रेड्याप्रमाणे निष्क्रिय असल्याचा आरोप भाजपने केला. यावेळी पालकमंत्री आणि महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपने शहरात उचलून धरलेला पाणी प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीत लातूरमधील सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुकी ठरू शकतो.

पालिकेत आणला रेडा

लातूर शहराला पुन्हा पिवळसर गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे , याचा निषेध करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याची महानगर पालिकेत चक्क रेडाच आणला . रेडा घेऊन गढूळ पाणी पुरवठ्या बाबत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शने अंदोलन केले .
रेडा जसा संवेदनाहिन आहे तसे महानगर पालिकेचे प्रशासन संवेदनाहिन झाले आहे . गढूळ पाण्यामुळं लोकांना किती त्रास होतो आहे याकडे कोणीही लक्ष देत नाही असं आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांचे म्हणण होतं .

हे सुद्धा वाचा

गढूळ पाण्याची समस्या काय?

मागील जवळपास 45 दिवसांपासून लातूरला पिवळसर पाणीपुरवठा होत होता. माहापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची डागडुजी केली. तसेच मांजरा धरणातील पाणी पुरवठा केंद्रातील जॅकवेलवरील दारे उघडण्यात आली. त्यानंतर सोमवारी काही भागात स्वच्छ पाणी आले. मात्र अनेक भागात अजूनही पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाल्याने भाजपने हे आंदोलन केलं. येत्या काही दिवसात लातूर महापालिकेची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेससाठी हा प्रश्न डोकेदुखी ठरणार आहे.

21 मे रोजी पालिकेची मुदत संपणार

लातूर महानगरपालिकेची मुदत येत्या 21 मे रोजी संपत आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षासाठी आता फक्त तीन दिवसांचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्यामुळे लातूरच्या निवडणुकाही लवकराक लवकर लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका होत असून इच्छुक कामालाही लागले आहेत.