औरंगाबादः ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी (Ellora Caves) व बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव (Ghrushneshwar Temple) मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटरवर देशातील सर्वात मोठं शिवलिंगाच्या आकारातील मंदिर उभारण्यात आले आहे. विश्वकर्मा मंदिर परिसरात हे भव्य मंदिर उभारण्यात आलं असून येथे बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात येत आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त (MahashivRatri) भाविकांसाठी हे मंदिर खुले करण्यात येणार आहे. विश्वकर्मा देवस्थान ट्रस्टचे सद्गुरू श्री महेंद्रबापू इलोडगड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवसांचा धार्मिक सोहळा येथे आयोजित कऱण्यात आला आहे.
वेरुळहून कन्नडकडे जाणाऱ्या महामार्गावर श्री विश्वकर्मा तीर्थधाम संस्था असून या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर आहे. या परिसरात बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरु आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना होणार आहे. तब्बल 23 वर्षांपासून सुरु असलेले मंदिराचे काम आता पूर्ण झाले असून 1 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे भाविकांसाठी खुले होत आहे.
स्थानिक पत्रकार वैभव किरगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना यज्ञ तर दुपारी शिववक्त जयंतीभाई शास्त्री यांच्या वाणीतून शिवकथा संपन्न होईल. याकरिता गुजरात राज्यातील भक्तपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित असेल. एक मार्च रोजी महाशिवरात्रीच्या पर्वावर शिवलिंगाची प्रतिष्ठापना व शिवकथेचा समारोप होणार आहे.
मंदिराची एकूण उंची 60 फूट , पिंड 40 फूट , शाळूका 38 फूट , मंदिराचा आकार 108 फुट बाय108 फूट असून हे मंदिर सोलापूर धुळे महामार्गावरती असल्याने या मार्गावरून येणारे जाणारे पर्यटक, भाविक व प्रवासी यांचे लक्ष या मंदिराकडे आकर्षित होत आहे.
इतर बातम्या-