औरंगाबादः लेन्सकार्ट या गॉगल्स व चश्मे विक्री करणाऱ्या कंपनीच्या स्टोअरमधून ग्राहकांनी खरेदी केलेल्या सामानाचे पैसे स्वतःच्या खात्यावर वळते करून कंपनीला 93 लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांपैकी एकाला औरंगाबाद पोलिसांनी (Cyber police) अटक केली आहे. ग्राहकांना कंपनीच्या बँक खात्याचा नंबर देण्याऐवजी स्वतःच्या खात्याचा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगून सेल्समनने 93 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी एकाला अटक केले.
सिडको परिसरातील रहिवासी शिरीषकुमार प्रतापराव पगारे यांनी लेन्सकार्ट कंपनीची गॉगल्स व चष्म्याच्या स्टोअर्सची फ्रँचायझी घेतली आहे. 4 नोव्हेंबर 2019 रोजी लेन्सकार्ट स्टोअरला मॅनेजर म्हणून मयूर देशमुख तर सेल्समन म्हणून दामोदर याची नियुक्ती केली होती. 10 नोव्हेंबर रोजी लेन्सकार्टच्या एरिया मॅनेजरने पगारे यांना फोन करून ग्राहकांना विक्री केलेल्या सामानाच्या कार्ड पेमेंटची काही रक्कम कंपनीकडे जमा झाली नसल्याचे सांगितले. पगारे हे ओमानमध्ये असल्याने त्यांनी भाऊ सुशील याला चौकशी करण्यास सांगितले. त्यांनी मॅनेजर आणि सेल्समनकडे चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला.
ग्राहकांकडून पैसे घेताना सेल्समन आणि मॅनेजरने ते पैसे आपल्या खात्यावर वळते करून घेतले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. दामोदर वामन गवई असे आरोपीचे नाव असून मुख्य आरोपी मयूर देशमुख फरार आहे. या प्रकरणात शमिता ऑरगॅनिक इंडिया कंपनीचे संचालक शिरीष कुमार पगारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादिने कंपनीमार्फत लेन्सकार्ट सोल्युशन्स या गॉगल्स व चष्मे विक्री करणाऱ्या कंपनीची फ्रँचायजी घेतलेली आहे. त्यांच्या स्टोअरमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर व सेल्समनविरोधात या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत असून मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या-