औरंगाबादची शान, ताजमहलची प्रतिकृती, बीबी का मकबरा एकदा पाहायलाच हवा !

| Updated on: Nov 03, 2021 | 10:31 AM

शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा स्थित आहे. बीबि का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगम च्या आठवणीत बांधण्यात आलाय. ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबीका मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखले जाते

औरंगाबादची शान, ताजमहलची प्रतिकृती, बीबी का मकबरा एकदा पाहायलाच हवा !
BIBI KA MAQBARA
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबादला ओळखळं जातं. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशी वेगवेगळी पर्यटनस्थळं या शहरात आहेत. मात्र यापैकी सर्वाच चर्चेत असलेलं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे औरंगाबादेतील बीबी का मकबरा. या वास्तूला पाहण्यासाठी जगभराहून लोक येतात.

बीबी का मकबरा म्हणजे  मिनी ताज

शहरापासून 3 किमी अंतरावर हा मकबरा स्थित आहे. बीबि का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बांधण्यात आला असे म्हटले जाते. ही वास्तू ताजचे अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबीका मकबऱ्याला मिनी ताज म्हणून ओळखले जाते. आग्रा येथील ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो अगदी तशीच भावना बीबी का मकबऱ्याला पाहून येते. त्याच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे.

औरंगाजेबचा मुलगा आझमशाहने मकबरा बांधला

बीबी का मकरबा या वास्तूला बांधण्यास सतराव्या शतकात सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे. 1657 साली औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम हीचा मुलाला जन्म देताना मृत्यू झाला. तिला जिथं दफन करण्यात आलं तिथेच नंतर हा बीबी का मकबरा उभारण्यात आला. औरंगजेबाचा मुलगा आझमशाहने हा मकबर बांधला असल्याचे म्हटले जाते.

बीबी का मकबराचे वैशिष्ट्य

ही वास्तू अत उल्ला यांनी बांधल्याचे म्हटले जाते. मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते. त्यासाठी दीडशेपेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला. हा मकबरा एका मोठ्या बागेच्या मधोमध आहे. मकबऱ्याच्या परिसरात असलेली भव्य बाग विशेष आकर्षण आहे.

बांधण्यासाठी लागले सात लाख रुपये

बीबी का मकबरा बांधण्यासाठी त्या काळात तब्बल सात लाख रुपये लागले होते. आज तुलना करायची झाल्यास ही वास्तू उभी करण्यासाठी 3.20 कोटी रुपये लागले होते. आग्रा येथील ताजमहल शुद्ध पांढऱ्या संगमरवराच्या मदतीने बांधण्यात आला होता. तर बीबी का मकबराचा गुम्बद संगमरवराचा वापर करण्यात आला.

कसे पोहोचाल ?

विमानाने : बीबी का मकबऱ्यापासून विमानतळ जवळपास 10 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने : रेल्वे स्टेशनपासून बीबी का मकबरा सुमारे 36 किलोमीटर दूर आहे.

वाहनाने : बिबी का मकबरा औरंगाबादपासून 4 किमी आहे, राज्य परिवहन बस किंवा खासगी टॅक्सीद्वारे भेट देता येते.

इतर बातम्या :

मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव

By Election 2021 Result : 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी

मुंबईत पुन्हा एनसीबीची कारवाई, विलेपार्ले परिसरातून कोट्यवधींचे हेरॉईन जप्त