औरंगाबाद : ज्या शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सध्या महावितरणकडून सुरू आहे. मात्र महावितरणच्या अशा धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांना ऐन पाणी देण्याचा हंगाम आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शेताला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पाण्याविना पिके सुकून जात असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता याविरोधात आमदार प्रशांत बंब हे रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर येत्या गुरुवारी मोर्चा काढणार आहेत.
महावितरण थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करत आहे. काही ठिकाणी तर थेट डीपीच बंद करण्यात आली आहे. यामुळे जे शेतकरी नियमित वीजबिल भरत आहेत त्यांना देखील आपल्या पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याभावी पिके जळून चालली आहेत. आता या विरोधात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आपल्या मगणीसाठी येत्या गुरुवारी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान महावितरणच्या मनमानी कारभाराचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. महावितरणने वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. जे शेतकरी वीजबिल भरणार नाही अशांचा विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे. विद्युतपुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. याचा सर्वाधिक फटका हा गहू आणि उसासारख्या पिकांना बसला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तर रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महावितरणचे थकीत बिल कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
Jalgaon : निधन झालेल्या वडिलांचा पुतळा तयार करून घेतले सात फेरे, जळगावातल्या अनोख्या लग्नाची गोष्ट
Mumbai : नारायण राणेंच्या इंग्रजीवरून सेना-भाजपमध्ये जोरदार सामना, शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल
सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है; नवाब मलिकांच्या ट्विटने तर्कवितर्कांना उधाण