Electricity Bill: महावितरणची महामोहीम! मराठवाड्यातील 31 हजार थकबाकीदारांचे मीटर जप्त करणार!

| Updated on: Dec 29, 2021 | 7:00 AM

मराठवाड्यातील 31 हजार 857 औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना महावितरणे यासंबंधीच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र त्यांनी वीजबिल न भरल्यामुळे अशा ग्राहकांचे वीजमीटर जप्त करण्यात येणार आहे.

Electricity Bill:  महावितरणची महामोहीम! मराठवाड्यातील 31 हजार थकबाकीदारांचे मीटर जप्त करणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही वीजबिल थकबाकी भरणा न केल्यामुळे महावितरण (MSEDCL) आता अशा ग्राहकांवर धडक कारवाई करणार आहे. मराठवाड्यातील 31 हजार 857 औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना महावितरणे यासंबंधीच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र त्यांनी वीजबिल न भरल्यामुळे अशा ग्राहकांचे वीजमीटर जप्त करण्यात येणार आहे. महावितरणने हा निर्णय घेतला असून, यासाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येईल.

महावितरणची हरघर दस्तक मोहीम

मराठवाड्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बिलाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. यातील अनेक ग्राहक दरमहा येणारे चालू महिन्यातील वीजबिल भरणा करीत नाहीत. त्यामुळे महावितरणने सोमवारापासून हर घर दस्तक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन वीजबिलाची वसुली करणार आहेत. मोहिमेत आधी औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वीज मीटर जप्त करणार

मराठवाड्यातील 31 हजार 857 ग्राहकांकडे 43.80 कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करून देखील ग्राहकांनी वीज बिल न भरल्यामुळे आता महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. अशा ग्राहकांचे वीजमीटर जप्त केले जाणार आहे. ही कारवाई टाळायची असेल तर औद्योगिक, वाणिज्यिक थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

इतर बातम्या-

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट, हंगाम अंतिम टप्प्यात तरीही ऊस शेतातच उभा

Pune | आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला, अमिताभ गुप्ता यांची माहिती