Aurangabad: कोणालाही फुकट वीज मिळणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा इशारा, शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

| Updated on: Dec 18, 2021 | 11:11 AM

महावितरण स्वतः वीज खरेदी करून नागरिकांना वीजेचा पुरवठा करते, त्यामुळे जे जे वीज वापरतात त्या सर्वांनी संपूर्ण बिल भरणे आवश्यक आहे. आता कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, शेतकऱ्यांनीही बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले.

Aurangabad: कोणालाही फुकट वीज मिळणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा इशारा, शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नितीन राऊत, ऊर्जा मंत्री
Follow us on

औरंगाबादः महावितरण कंपनी स्वतः वीज विकत घेऊन नागरिकांना वीज पुरवठा करते. त्यामुळे जे वीजेचा वापर करतात, त्या सर्वांना पैसे भरावेच लागतील. कोणालाही वीज फुकट मिळणार नाही. कोरोनामुळे इतर विभागांप्रमाणे महावितरणदेखील (MSEDCL) अडचणीत आले आहे. सध्या महावितरणची थकबाकी 71 हजार कोटी रुपयांची आहे. ग्राहकांनी बिले भरली तरच महावितरणचा कारभार सुरुळीत चालू शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांनी वीज बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी औरंगाबादेत केले.

राज्याकडून मदत मिळाली तरच सवलत, अन्यथा माफी नाही

औरंगाबाद येथील महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात विभागातील लोकप्रतिनिधींसोबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, आ. उदयसिंह राजपूत, शहर काँग्रेस अध्यक्ष हिशाम उस्मानी, यांच्यासह महावितरणचे अभियंते व अधिकारी उपस्थित होते. गंगापूर, कन्नड, वैजापूर येथील शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही म्हणून तेथील वीजपुरवठा काही दिवसांपूर्वी खंडित करण्यात आला होता. याविरोधात लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले होते.

बिल माफ करण्याच्या मागणीवर काय म्हणाले मंत्री?

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून चालू एक बिल माफ भरून घेण्यासंबंधी मागणी केली. राज्याकडून शेतीपंपांच्या वीज बिलासाठी विशेष आर्थिक मदत दिली तर सवलत देता येईल, अन्यथा कंपनी चालवायची असेल तर किमान चालू दोन वीज बिले भरून घेणे आवश्यक असल्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र काही शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांना हप्त्याची सवलतही दिल्याचे त्यांनी सांगितले.

दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे आदेश

अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्यामुळे ज्या भागातील वीजेचे खांब वाकले आहेत, तारा लोंबकळत आहेत, रोहित्र झुकले आहे, डीपी बॉक्स उघडे आहेत, अशा ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना नितीन राऊत यांनी संबंधितांना दिल्या.

इतर बातम्या-

Nashik| नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Railway: नवीन वर्षापासून मराठवाड्यातून पुण्यासाठी नवी रेल्वे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती