औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad municipal corporation) गुंठेवारीतील मालमत्ता नियमितीकरणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून याच हवा तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नियमितीकरणाकडे दुर्लक्षण करणाऱ्या 300 मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. त्यांना लवकरच नोटीसा दिल्या जाणार आहेत. 15 दिवसात मालमत्ता नियमितीकरणाची प्रक्रिया न झाल्यास मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी या मालमत्तांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
मनपाने मागील तीन महिन्यांत 100 मालमत्तांचे गुंठेवारी अंतर्गत नियमितीकरण करून घेतले. तर 2400 पेक्षा जास्त संचिका मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातून महापालिकेला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी क्षेत्रातील मालमत्ता शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शहरातील अनेक व्यावसायिक मालमत्तांची गुंठेवारी करुन घेण्यासाठी संचिका दाखल करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.
इतर बातम्या-