औरंगाबादः शहरातील हडको कॉर्नर येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ओबीसी सेल (OBC ), अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पूजन करण्यात आले. केंद्र सरकारने ओबीसींचा जमा असलेला इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा व ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) पूर्ववत करुन द्यावे याची सुबुद्धी केंद्र सरकारला द्यावी यासाठी होमहवन व पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि अमित शहा यांचे तैलचित्र खुर्चीवर ठेवून केंद्र सरकार प्रसन्न व्हावे, अशी विनंतीही करण्यात आली.
या पूजनप्रसंगी पुरोहितांनी ओबीसी आरक्षणाची मागणी 15 दिवसात मान्य होईल, असे म्हटले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज घोडके म्हणाले, आम्ही पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे आहोत. आपल्या शब्दानुसार, निर्णय झाल्यास तुमचा जाहीर सत्कार समारंभ साजरा करू. मनोज घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली निशांत पवार, योगेश हेकाडे, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सरोज नवपुते, शहराध्यक्ष सुभद्रा जाधव आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्राच्या ओबीसी आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा आणि मोठा आहे. कारण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या तीन याचिकांवर सुनावणी होणार आहे. घ्यायच्या तर पूर्ण निवडणुका घ्या किंवा मग निवडणुकाच नको अशी भूमिका राज्य सरकारनं घेतलीय. त्यावर आघाडीतल्या ओबीसी नेत्यांचं एकमत आहे. राज्य सरकारनेही हीच भूमिका सुप्रीम कोर्टात मांडली आहे. त्यावरच आज सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण स्थगित केलंय. त्या आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या तीन अटी पूर्ण केलेल्या नसल्याचा ठपका राज्य सरकारवर ठेवण्यात आलाय. त्यातली इम्पेरिकल डाटाची अट महत्वाची आहे. ह्या सगळ्या संदर्भातल्या तीन याचिका आज सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर असतील.
इतर बातम्या-