औरंगाबादः महापालिकेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन मामलत्तांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम नुकतीच सुरु झाली आहे. यासाठी पालिकेने 200 कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. कर्मचाऱ्यांची ही पथके शहरातील कॉलनींमध्ये जाऊन तेथील मालमत्तांची पाहणी करत आहेत. मात्र बुधवारी यातील पथकाला वॉर्ड क्रमांक 27 आणि वॉर्ड क्रमांक 30 मध्ये मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.
महापालिकेने 1 जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्याकरिता दोनशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात झोन क्रमांक 3 आणि 4 मध्ये हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र झोन क्रमांक तीनमधील वॉर्ड क्रमांक 27, शताब्दी नगगर आणि झोन क्रमांक 30, पवन नगरमध्ये महापालिकेच्या पथकाला नागरिकांकडून कडाडून विरोध झाल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना घरात घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे अनेक मालमत्तांचे सर्वेक्षम न करताच पथकाला परतावे लागले. काही माजी लोकप्रतिनिधींकडूनही पथकाला विरोध केला जात आहे.
दरम्यान सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांकडून वेगवेगळे आरोप करून त्यांच्या विरोधात तक्रार दिली जाऊ शकते. ही शक्यता गृहित धरून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी मोबाइल क्रमांकासह पोलीस आयुक्तांना सादर केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात कुणी तक्रार दिली तर पोलिसांनी आधी मनपा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासकांनी केले आहे. तसेच कर्चमाऱ्यांना सर्वेक्षण करतेवेळी विरोध करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
इतर बातम्या-