औरंगाबाद : देश तसेच राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी ठिकठिकाणी अनेक प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकेला इंधन नाकारल्याचा एक गंभीर प्रकार औरंगाबादेत घडला आहे. मृतदेह घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला येथील क्रांतीचौक पेट्रोल पंपावर चक्क तासभर ताटकळत ठेवण्यात आलंय. या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेला पेट्रोल देण्यास मनाई केली. आज (2 जून) सकाळी हा प्रकार घडला. यावेळी रुग्णवाहिकेचा चालक पेट्रोलसाठी तब्बल तासभर विनवणी करीत होता. (Petrol pump workers denied Petrol to Ambulance carrying dead body kept waiting for One hour in Aurangabad)
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेत रुग्णवाहिकेतून एक मृतदेह नेण्यात येत होता. यावेळी इंधन संपत आल्यामुळे चालकाने रुग्णवाहिका क्रांतीचौक येथील पेट्रोल पंपावर नेली. तसेच त्याने रुग्णवाहिकेमध्ये पेट्रोल भरण्याची पंपचालकांना विनंती केली. मात्र, यावेळी पंप चालकांनी इंधन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. रुग्णवाहिकेतील मृतदेहाची स्थिती पाहून रुग्णवाहिका चालकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना इंधन देण्याची पुन्हा-पुन्हा विनंती केली. मात्र, तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी इंधन दिले नाही.
या सर्व प्रकारामुळे पेट्रोल पंपावर तब्बल तासभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार समजल्यानंतर एका सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोकोचा इशारा दिला. त्यानंतर पेट्रोल पंपावर पुरता गोंधळ उडाला होता.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, चिघळते वातावरण पाहून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी पंपचालक आणि सामाजिक संघटना यांच्यात मध्यस्थी केली. त्यानंतर रुग्णवाहिकेला इंधन मिळाले. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे रुग्णवाहिकेतील मृतदेह तब्बल एक तास जागेवर पडून होता. याच कारणामुळे संताप व्यक्त केला जातोय.
दुकानांना सील ठोकल्यामुळे तसेच अवाजवी दंड लावल्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले होते. त्यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधक नियम लागू आहेत. आज त्यातील काही नियम शिथिल झाले असून लोक दुकाने सुरु करत आहेत. या पार्श्वभूमीवर 1 जून रोजी इम्तियाज जलील शहरातील कामगार कार्यालयात गेले. यावेळी ते येथील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यानंतर जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या :
शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा
औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या दोन गटात तुफान राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
दुकानांना सील ठोकून हजारो रुपयांचा दंड, इम्तियाज जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले
VIDEO : 7 जुलैला राज्याचं पावसाळी अधिवेशन, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय#MaharashtraMonsoonSession #MonsoonSession @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #MVA pic.twitter.com/ZEhZNAxJZX
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
(Petrol pump workers denied Petrol to Ambulance carrying dead body kept waiting for One hour in Aurangabad)