भल्या मोठ्या सैन्याला जेवण कसे द्यायचे? तुघलकांनी तयार केला अनोखा पदार्थ, जो आजही ठरतोय औरंगाबादच्या खवैय्यांची पहिली पसंत!

| Updated on: Nov 29, 2021 | 8:00 AM

ऐतिहासिक शहराच्या वास्तूंच्या निर्मितीमागे जसा इतिहास असतो, तसा प्रत्येक शहराच्या लोकप्रिय खाद्य पदार्थाचाही इतिहास असतो. इथल्या परंपरांमध्ये या खाद्यपदार्थानं वेगळं स्थान मिळवलेलं असतं. औरंगाबादचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ नान खलियालाही असाच एक इतिहास आहे.

भल्या मोठ्या सैन्याला जेवण कसे द्यायचे? तुघलकांनी तयार केला अनोखा पदार्थ, जो आजही ठरतोय औरंगाबादच्या खवैय्यांची पहिली पसंत!
औरंगाबादचा प्रसिद्ध पदार्थ नानखलिया
Follow us on

औरंगाबादः इतिहासाच्या, आक्रमणाच्या अनेक खुणा अंगाखांद्यावर खेळवणारं औरंगाबाद (Aurangabad) शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. शहरावर, इथल्या परिसरावर राज्य करणाऱ्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांच्या खुणा इथल्या माती, इथल्या गड-किल्ल्यांत अजूनही जिवंत आहेत. शहरातल्या वास्तु जशा इथल्या इतिहासाच्या घटना कथन करतात, त्याप्रमाणेच इथल्या खाद्यसंस्कृतीतूनही इतिहासातील काही संदर्भ मिळतात. औरंगाबादमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ असलेल्या नान खलिया (Nan Khalila) या पदार्थालाही असाच एक इतिहास आहे.

कथा नान खलियाच्या निर्मितीची

प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ दुलारी कुरेशी यांनी औरंगाबादच्या खाद्य संस्कृतीवरही सविस्तर अभ्यास केलाय. त्यांनी नान खलिया या खाद्यपदार्थाच्या निर्मितीचीही कथा सांगितली आहे. औरंगाबाद शहराची निर्मिती होण्याचा आधी दौलताबाद हे एक आबाद शहर होते. म्हणूनच खाद्यपदार्थाची सुरुवात येथून झाली. मोहम्मद तुघलकाने जेव्हा हिंदुस्तानच्या राजधानीचे स्थलांतर दिल्लीहून औरंगाबादला केले तेव्हा सुरुवातीला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे एवढ्या मोठ्या सैन्याचे भोजन कसे तयार करायचे? हा प्रश्न त्याने सोडवला, तो नव्या खाद्य पदार्थाच्या निर्मितीतून. हाच पदार्थ म्हणजे नान खलिया!

कसा बनवतात नान खलिया?

नान खलिया हा पदार्थ पूर्ण मांसाहारी आहे. नान म्हणजे रोटीचा प्रकार व खलिया म्हणजे मटण. यात नान ही तंदूरमध्ये बनवत असत. म्हणजे मोठे खड्डे खोदून त्यात जळाऊ लाकूट लावून एकेका वेळेस शंभर शंभर नान बनवत असत. असे अनेक तंदूर लावून हजारो नान बनवले जात. तसेच अनेक मोठ्या देगमध्ये मटण, दही, धणे, गरम मसाला, वाटून ते शिजवले जात. पुढे दख्खनची राजधानी दौलताबादहून औरंगाबादला स्थलांतरीत झाली, तसे इथल्या खाद्यपदार्थाचेही स्थलांतर झाले.

गरीब असो की श्रीमंत, नानखलियाचे दिवाने अनेक!

औरंगाबादमधील मांसाहारी खाद्यपदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींची कोणतीही पार्टी असो, लग्न असो वा इतर कार्यक्रम. गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाकडे नान खलिया असतोच. नान खलियाच्या चाहत्यांनी तर नानखलिया क्लबदेखील स्थापन केले आहेत. दर आठवड्यात एका सदस्याकडे नान खलियाची पार्टी असते. नान खलियाच्या पार्टीत मित्रांना आवर्जून बोलवण्याची प्रथा इथे आहे. शहरातील रोशन गेट, कटकट गेट, सिटी चौक, चंपा चौक, बुढी लेन परिसरातील हॉटेलमध्ये मिळणारा लाजवाब नान खलिया चाखणारे हजारो दिवाने इथे सापडतील.

इतर बातम्या-

सौ दर्द छुपे है सिने में… मगर अलग मजा है जिने में… भुजबळांची शेरोशायरीतून तिरंदाजी सुरू असतानाच वीज गेली अन्…

बर्मा बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ट्रॅक