पंतप्रधानांसमोर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, लसीकरण वाढवण्यासंबंधीच्या योजनांची दिली माहिती

| Updated on: Nov 03, 2021 | 1:43 PM

औरंगाबादः देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप कमी झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील उपाययोजनांची आढावा बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव […]

पंतप्रधानांसमोर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, लसीकरण वाढवण्यासंबंधीच्या योजनांची दिली माहिती
औरंगाबादमधील कमी लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
Follow us on

औरंगाबादः देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप कमी झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील उपाययोजनांची आढावा बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांच्यासह इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीदेखील उपस्थित होते.

कमी लसीकरण झालेल्या जिह्ल्यांना वेग वाढवण्याच्या सूचना

महाराष्ट्र राज्याने 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र आजही अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. औरंगाबदमध्येही सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 23,80,175 लोकांनी पहिला तर 07, 28,435 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण फक्त 22.59 टक्के एवढे आहे. देश पातळीवर तुलना करता ज्या जिल्ह्यांचे लसीकरण कमी झाले आहे, अशा 45 जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतला. यात महाराष्ट्रातील औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नंदुरबार, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली उपाययोजनांची माहिती

दरम्यान, पंतप्रधानांच्या या आढावा बैठकीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरण वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण सुरु केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

बैठकीच्या पूर्वसंध्येला उपाययोजना

या बैठकीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये जास्तीत जास्त लसीकरण वाढण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये कुटुंबाचे लसीकरण नसेल तर धान्य देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्था, कार्यालयांनीही कर्मचाऱ्यांना लसीकरणाशिवाय कार्यालयात प्रवेश देऊ नये, असेही सांगण्यात आले आहेत. दुकाने, हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी किमान एक लस घ्यावी, तरच दुकान चालवण्याची परवानगी मिळेल, असेही बजावण्यात आले आहे. मनपा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहीम 100 टक्के राबवण्याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या-

गुंठेवारी संचिकांसाठी वास्तुविशारदांना पैसे देऊ नका, औरंगाबाद महापालिकेचे आवाहन, पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार!

औरंगाबादेत नो व्हॅक्सिन नो रेशन, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, डिसेंबरचे वेतनही रोखणार, वाचा आणखी काय सूचना?