औरंगाबादः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. कोरोनाच्या लाटेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच औरंगाबादेत येत आहेत. या बैठकीकरिता सोमवारी संध्याकाळीच राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झाले. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारीही केली होती. ठरल्याप्रमाणे शनिवराी रात्री औरंगाबादेत महावीर चौकात त्यांचे ढोल, ताशांच्या गजरात स्वागत झाले. त्यानंतर ते मनसैनिकांच्या दुचाकी रॅलीबोसबत सुभेदारी विश्रामगृहाकडे निघाले. वाहनातून उतरून त्यांनी मनसैनिकांचे स्वागत स्वीकारले नाही.
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते महावीर चौकात उभे होते. त्यांचे स्वागत स्वीकारण्याऐवजी राज ठाकरे यांनी थेट विश्रामगृहाचा मार्ग धरला. याकरिता विश्रामगृहात पोहोचल्याबरोबर आधी त्यांनी कार्यकर्त्यांची माफी मागितली. राज ठाकरे म्हणाले, ‘काही महिन्यांपूर्वी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याचे काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी आणखी काही काळ विश्रांती घ्यायला सांगितले आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर, आणि औरंगाबादमध्येही येताना कारमधून खाली उतरून मी तुमचा सत्कार स्वीकारू शकलो नाही. ‘
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सामना करण्याकरिता औरंगाबादमध्ये मनसे भाजपसोबत युती करणार का, की स्वबळावर लढणार या प्रश्नाचे उत्तरही आज मिळण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकारांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्याचा कार्यक्रम राजकीय नसून संघटनेचा आहे. कार्यकर्त्यांनीही संघटना बांधणीकडे लक्ष द्यावे, असे कालच्या संवादात म्हटले.
इतर बातम्या-