पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना.. कर्मचारी पेट्रोल देत नसल्याने कलाकारांनी भरवली मैफल, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Oct 19, 2021 | 10:52 AM

औरंगाबादः रात्रीच्या सुमारास प्रवास करताना गाडीतील पेट्रोल संपले, रस्त्यात पेट्रोलपंपही लागला, पण कर्मचाऱ्यांनी पेट्रोलच दिले नाही तर तुम्ही काय कराल. राग येईल, संताप येईल. आता पुढचा प्रवास कसा करायचा, याची चिंता सतावेल. त्यातच घरातली मंडळी सोबत असेल तर आणखीच पंचायत होईल. पण औरंगाबादमध्ये घडलेल्या (Aurangabad petrol pump) अशा एका प्रसंगात पेट्रोलपंपावर आलेल्या लोकांनी वेगळीच प्रतिक्रिया […]

पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना.. कर्मचारी पेट्रोल देत नसल्याने कलाकारांनी भरवली मैफल,  व्हिडिओ व्हायरल
औरंगाबाद-जळगाव रोडवरील पेट्रोल पंपावरील व्हिडिओ व्हायरल
Follow us on

औरंगाबादः रात्रीच्या सुमारास प्रवास करताना गाडीतील पेट्रोल संपले, रस्त्यात पेट्रोलपंपही लागला, पण कर्मचाऱ्यांनी पेट्रोलच दिले नाही तर तुम्ही काय कराल. राग येईल, संताप येईल. आता पुढचा प्रवास कसा करायचा, याची चिंता सतावेल. त्यातच घरातली मंडळी सोबत असेल तर आणखीच पंचायत होईल. पण औरंगाबादमध्ये घडलेल्या (Aurangabad petrol pump) अशा एका प्रसंगात पेट्रोलपंपावर आलेल्या लोकांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली. याचे कारणही विशेष होते. पेट्रोलपंपावर ज्यांची पंचाईत झाली, ती लोकं कलाकार मंडळी होती. मग काय.. पेट्रोलची मागणी करण्यासाठी त्यांनी गाणंच तयार केलं. या कलाकारांनी (Artist on Petrol) तयार केलेलं गाणं सोशल मीडियावर सध्या तुफान गाजतंय.

औरंगाबाद-जळगाव मार्गावरील पंप फेमस

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील चिंचखेडा पेट्रोलपंपावर रात्री दीडच्या सुमारास हा सगळा ड्रामा चालला. रात्री दीड वाजता कलाकारांचं एक पथक या पेट्रोलपंपावर पोहोचलं. गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणून कर्मचाऱ्यांना पेट्रोल भरून द्यायला सांगितलं. पण कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यास थेट नकार दिला. अशा वेळी बायका-पोरांना घेऊन पुढे प्रवास कसा करायचा, असा प्रश्न कलाकारांना पडला. यावेळी अनोख्या शैलीत पेट्रोलची मागणी केली.

गाणे सूचले अन् व्हिडिओच केला

पेट्रोल मिळत नसल्याने या कलाकारांनी स्वतःच्याच शैलीत गाणं तयार केलं…
पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना…
पोरं सोरं सोबत आहेत.. पेट्रोल मला द्या ना..
रातची वेळ आहे थोडं समजून तुम्ही घ्या ना…
पेट्रोलवाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना…
रातची वेळ आहे, तुम्ही 10-5 शिल्लक घ्याना..
पेट्रोल वाल्या दादा तुम्ही पेट्रोल मला द्या ना…
अशा प्रकारे जागेवरच गाणे तयार करून या कलाकारांना पेट्रोल कर्मचाऱ्यांकडे मागणी केली. औरंगाबादच्या पेट्रोलपंपावरचे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पैठणः वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्राहकांची मागणी

जुन्या पैठणमधील रंगारहाटी, हताई गल्ली, दुर्गावाडी, गाजीवाडा, नेहरू चौक, इमली पार्क गल्ली, जोहरीवाडा, पॉवर हाऊस गल्ली, शनी मंदिर गल्ली भागातील घरगुती विजेचा लपंडाव सुरू असून ऐन सणाच्या काळात कोणत्याही वेळी वीज ग्राहक त्रस्त झाले आहे. वीज अचानक जात असल्यामुळे याचा फटका दसरा सणात जुन्या पैठणमधील रहिवाशांना बसला. वीज ग्राहकांनी संताप व्यक्त करून जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत जुन्या पैठणमधील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचना वीज महावितरण कंपनीस द्याव्यात अशी मागणी वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

इतर बातम्या-

‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी औरंगाबादेत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन, राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी