Sanjay Raut : पंतप्रधानांना हृदय आहे की नाही?, हाच का तुमचा सनातन धर्म?; संजय राऊत यांचा हल्लाबोल का?

| Updated on: Sep 15, 2023 | 11:24 AM

अजित पवार शरद पवार यांच्यासोबतच्या कार्यक्रमात जाणं टाळलं ते चांगलं झालं. अजितदादांना त्यांचं मन खात असेल. मी पाप केलं असं त्यांना वाटत असेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut : पंतप्रधानांना हृदय आहे की नाही?, हाच का तुमचा सनातन धर्म?; संजय राऊत यांचा हल्लाबोल का?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद | 15 सप्टेंबर 2023 : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. हे चारही जण वरिष्ठ अधिकारी होते. ते शहीद झाल्याने संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले आहेत. अशावेळी भाजपच्या कार्यालयात एक मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. चार जवान शहीद झाले. पंतप्रधान त्यांच्या कार्यालयात स्वत:वर फुले उधळून घेत आहेत. पंतप्रधानांना हृदय आहे की नाही? हाच का तुमचा सनातन धर्म? असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

हे सरकार डरपोक आणि बेकादेशीर आहे. प्रत्येक संकटापासून पळून जात आहे. तोंडाला पानं पुसत आहे. देशाची परिस्थिती गंभीर आहे. काश्मीरात एक डीएसपी आणि एक गनमन शहीद झाले. चार लष्करी अधिकारी एकाचवेळी शहीद होतात, सारा देश दु:ख सागरात बुडाला. वरिष्ठ अधिकारी शहीद झाले अन् आमचे पंतप्रधान तिथे दिल्लीत पक्षाच्या कार्यालयात स्वत:वर फुले उधळून घेत होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हा त्यांचा भारत, आमचा नाही

मला आठवतंय दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील हे खान मार्केटमध्ये गेले होते. नंतर त्यांनी शर्ट बदललं तर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काल चार जवानांनी हौतात्म्य पत्करलं. त्यांच्या कुटुंबीयावर शोककळा पसरली आणि पंतप्रधान काल दिल्लीत फुलं उधळून घेत होते. हा त्यांचा सनातन धर्म आहे. आमचा नाही. हा त्यांचा भारत आहे. आमचा नाही. चार जवान शहीद झाले. ते भारताचे होते. नुसतं इंडियाचं भारत केलं म्हणून चालणार नाही. हे ढोंग बंद करा, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

कुठे आहेत सनातन धर्मवाले?

हे सर्व प्रश्न आम्हाला उद्या गृहमंत्र्यांना विचारायचं होते. देशातील अंतर्गत सुरक्षा गृहमंत्र्यांची जबाबदारी होती. बाह्य सुरक्षा राजनाथ सिंह यांची आहे. काल फुलं उधळताना राजनाथ सिंहही तिथेच होते. देश कोणत्या दिशेने चालला आहे? एका तरी बेगडी सनातन धर्मवाल्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त केली का? त्यांच्या घरी गेले का? पंतप्रधानांनाही हृदय नावाची गोष्ट आहे का नाही? सनातन धर्माच्या गोष्टी करतात. मानवता, मनुष्यपण कुठे आहे? जवान मरत आहेत आणि तुम्ही फुले उधळत आहात. यालाच हुकूमशाही म्हणतात, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यात बेकायदेशीर सरकार

यावेळी त्यांनी अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरूनही जोरदार टीका केली. महाराष्ट्रात वेगळं काय नाही. बेकायदेशीर सरकारचा निकाल 40 तासात लागायला हवा होता. बेकायदेशीर सरकार सत्तते आहे. बेकायदेशीर निर्णय घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंची निवड बेकायदेशीर ठरवली. राज्यपालांची कारवाई बेकायदेशीर आहे. पण विधानसभा अध्यक्ष त्यावर कारवाई करत नाही. काल सुनावणी घेतली आणि पुढची तारीख दिली, असं राऊत म्हणाले.