उद्या सरसंघचालक औरंगाबादेत, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा, प्रचारकांच्या भेटीगाठी, आढावा बैठकांचे आयोजन

| Updated on: Nov 10, 2021 | 11:50 AM

सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील.

उद्या सरसंघचालक औरंगाबादेत, 10 वर्षांनंतर प्रथमच मोठा दौरा, प्रचारकांच्या भेटीगाठी, आढावा बैठकांचे आयोजन
सरसंघचालक मोहन भागवत यांचा उद्यापासून औरंगाबादमध्ये दौरा
Follow us on

औरंगाबादः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat) उद्यापासून म्हणजेच 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी 2011 मध्ये सरसंघचालकांनी औरंगाबादमध्ये तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ते 5 दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात संघटनात्मक कार्यासंबंधीची बैठकांचे आयोजन या काळात केले जाईल.

11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी औरंगाबादेत

सरसंघचालक मोहन भागवत 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांचे व गुरुद्वाराचे दर्शन घेऊन संध्याकाळी औरंगाबादेत येतील. याच दिवशी संघाच्या नगर स्तरावरील कार्यकर्त्यांचा सहकुटुंब एकत्रिकीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत हे पर्यावरण, सामाजिक समरसता आणि कुटुंब प्रबोधन या विषयांवर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.

12 नोव्हेंबरनंतर तीन दिवस प्रचारकांच्या बैठका

पुढील मुक्कामात सरसंघचालक 12,13 आणि 14 रोजी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विविध बैठका घेतली. पहिल्या दोन दिवसात प्रामुख्याने औरंगाबादमधील पूर्णवेळ कार्य करणाऱ्या प्रचारकांच्या आणि प्रांत कार्यकारिणी मंडळाच्या बैठका आणि काही स्वयंसेवकांच्या भेटी घेणार आहेत. 14 नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था, संघटनांची समन्वय बैठक होईल. यात सरसंघचालक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करतील. 15 नोव्हेंबर रोजी ते विमानाने हैदराबाद मार्गे कोलकत्याला रवाना होतील.

सर्व कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवनात

सरसंघचालकांच्या पाच दिवसीय दौऱ्यातील सर्व महत्त्वाचे कार्यक्रम सिडकोतील अग्रसेन भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. आयोजन स्थळी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असेल. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी माहिती देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव आणि देवगिरी प्रांत कार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य अॅड. आशिश जाधवर, विश्व संवाद केंद्र संयोजक ओंकार शेलदरकर, शहर प्रचारप्रमुख चेतन पगारे यांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

धक्कादायकः औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? मद्यधुंद बापानेच घात केल्याचा संशय

अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात