शाळा उघडण्याच्या बातमीनं विद्यार्थ्यांमध्ये आनंद, वाचा औरंगाबाद जिल्ह्यात किती खासगी, किती सरकारी शाळा?

| Updated on: Sep 25, 2021 | 2:39 PM

औरंगाबाद शहरातील शाळांची संख्या एकूण 850 आहे. शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थीसंख्या 2 लाख 77 हजार 533 एवढी आहे.

शाळा उघडण्याच्या बातमीनं विद्यार्थ्यांमध्ये आनंद, वाचा औरंगाबाद जिल्ह्यात किती खासगी, किती सरकारी शाळा?
शाळा सुरु
Follow us on

औरंगाबाद: जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून राज्यभरातील शाळांना (Schools in Maharashtra state) टाळं ठोकण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचे रुग्ण बहुसंख्येने कमी आढळून येत असल्याने आता शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा खुले करण्याचा (School Reopen ) निर्णय राज्य सरकारने घेतला. ग्रामीण भागात पाचवी ते आठवी तर शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने दिला आहे. त्यामुळे औरंगाबादमधील सरकारी आणि खासगी शाळा प्रशासन (Schools in Aurangabad district) विद्यार्थ्यांच्या आगमनाच्या तयारीत लागले आहे.

आता ऑनलाइनऐवजी मित्रांसोबत शिकणार

मागील दीड वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शाळेत मित्रांसोबत शिकायला मिळणार, या भावनेनेच खूप आनंद होत आहे. एवढे दिवस ऑनलाइन वर्गात मित्र दिसत होते, पण त्यांच्याशी थेट भेट होत नव्हती. आता मात्र मित्रांसोबत मजा, मस्ती करत शिकण्याची संधी अनेक दिवसानंतर मुलांना मिळत आहे. तर घरातून शिकवणाऱ्या शिक्षकांनाही आता शाळेच्या वर्गात प्रत्यक्ष समोरासमोर मुलांना शिकवायला मिळणार असल्याने शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे.

अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा!

राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात किती शाळा?

औरंगाबाद जिल्ह्यात 2,131 जिल्हा परिषदेच्या शाळा, 31 शासकीय शाळा आणि 978 खाजगी अनुदानित शाळा तसेच 1,462 खाजगी विनाअनुदानित शाळा आहेत. अशा प्रकारे एकूण जिल्हाभरातील शाळांची संख्या 4 हजार 602 अशी आहे.

शहरात एकूण किती शाळा?

औरंगाबाद शहरातील शाळांची संख्या एकूण 850 आहे. शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थीसंख्या 2 लाख 77 हजार 533 एवढी आहे.

आदेशानुसार शाळेची घंटा वाजणार- शिक्षणाधिकारी

सध्या 15ऑगस्टपासून ग्रामीण भागातीली कोविडमुक्त गावात 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तर 5 वी ते 7 वीपर्यंतच्या शाळांना 6 सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. शहरातील सर्वच शाळा मात्र पूर्णपणे बंद आहेत. शासनाच्या निर्णयानुसार आता 4 ऑक्टोबरपासून औरंगाबाद जिल्ह्यातील 8 वी ते 12 पर्यंतच्या शाळा उघडल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिली. (Schools in Aurangabad will reopen on 4th October total number of schools in Aurangabad)

इतर बातम्या- 

Maharashtra School Reopen: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता, ‘या’ दिवशी शाळा सुरु

Varsha Gaikwad : ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाड