औरंगाबाद: शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दलच्या पत्राचं प्रकरण चर्चेत आहे. हे प्रकरण ताजं असताना शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनीच विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजपनं शिवसेनेला टार्गेट केलेलं आहे. राज्यात परिवहन मंत्रिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर परंडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी हे पत्र लिहिल्यानं चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तानाजी सावंत यांची सुरू आहे नाराजी
प्रति,
मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई- 32
!! यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !!
विषय:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे बाबत..
महोदय,
उपरोक्त विषयान्वये विनंती की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या करिता एस. टी. कामगार संघटनांनी राज्यभर संप सुरू केलेला असून एस.टी. कामगारांच्या बऱ्याच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत परंतु एस. टी. कामगार संघटना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असून विलीनीकरणासह अन्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची संघटनेने मागणी केलेली आहे.
त्या अनुषंगाने एस.टी. कामगार संघटनेचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा ही नम्र विनंती.
आपला स्नेहांकीत,
(प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत)
आमदार भूम-परंडा मतदारसंघ
Goa Assembly Election 2022 : काँग्रेस, आपच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून संधी?
Shivsena MLA Tanaji Sawant wrote letter to Uddhav Thackeray demanded ST Merger in Government