औरंगाबाद: सप्टेंबरचा संपूर्ण महिना आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या दरांनी (Gold Silver price) चांगलीच घसरण अनुभवली. मागील पंधरा दिवस पितृपक्ष असल्याने ग्राहकांनी स्वस्त असूनही सोन्याकडे पाठ फिरवली होती. मात्र आता नवरात्रीला सुरुवात झाली असून सोने खरेदीसाठी बाजारात (Aurangabad sarafa Market) ग्राहाकांची गर्दी वाढत आहे. औरंगाबादमध्ये मागील तीन दिवसांच्या तुलनेत सोन्याचे दर वाढलेले दिसून आले तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
शहरात आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीचे भाव काहीसे घसरलेले होते. मात्र आज 08 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सोन्याच्या दरांनी काहीशी चढण घेतलेली दिसून आली. बुधवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 46,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले होते. तर शुक्रवारी हे दर 46,800 रुपये एवढे झाले. तसेच चांदीच्या दरातही चांगलीच वाढ झालेली दिसून आली. बुधवारी एक किलो शुद्ध चांदीचे दर 63,500 रुपये एवढे होते. हे भाव शुक्रवारी पाचशे रुपयांनी वाढले. बुधवारी एक किलो शुद्ध चांदीचे भाव 64,000 रुपयांच्या जवळपास होते. शेअरबाजारातील चढ-उतारानुसार विविध शहरांमधील सोन्या-चांदीचे भावही कमी-जास्त होत असतात. मात्र इथे भाव हे दिवसभरातील सरासरी काढून देण्यात आलेले आहेत. येत्या काही दिवसात सोन्या-चांदीचे भाव आणखी वाढतील, असा अंदाज औरंगाबादच्या सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.
सोने-चांदी खरेदीसाठी नवरात्र हा शुभ मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या काळात दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा असतो. औरंगाबादच्या सराफा बाजारातही टेंपल ज्वेलरी, कंगन, नेकलेस, अंगठ्या, बाजूबंद यासारख्या दागिन्यांची खरेदी वाढलेली आहे. विजयादशमी आणि पुढे दिवाळीपर्यंत दागिने खरेदीचा ट्रेंड वाढत जाईल, अशी माहिती दत्ता सराफ यांनी दिली.
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.
पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.
इतर बातम्या-
Gold Price: सोन्याचा भाव पुन्हा वधारला, चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे दर