औरंगाबादः सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी आज मतदान घेतले जाणार आहे. यासाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपा-शिवसेना आणि आघाडी यांच्यात चारही प्रभागात तिरंगी लढती होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर चार जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यापूर्वी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येथील 13 जागांसाठीचे मतदान पार पडले होते. एकूण 17 जागांपैकी आता उर्वरीत चार प्रभागांमध्ये आज मतदान घेतले जाईल. उद्या 19 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
सोयगावमधील चार प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. चार प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी या तिघांचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादीचे दोन याप्रमाणे आघाडीने चार जागा वाटून घेतल्या आहे. त्यामुळे चार जागांसाठी तिरंगी लढत लक्षवेधी होणार असल्याचे चित्र आहे.
सोयगावमधील एकूण 17 पैकी 13 जागांसाठी यापूर्वी 21 डिसेंबरला मतदान झाले होते. तेरा जागांच्या निवडणुकीनंतर पुन्हा चार जागांसाठी सोयगावला रणसंग्राम रंगणार असून यामध्ये आता या चार जागांमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. प्रभाग एक,दोन,चौदा आणि सोळा यासाठी निवडणूक होत असून बारा उमेदवारांमध्ये सहा महिला उमेदवार रिंगणात असून भाजपा-दोन,शिवसेना-दोन,राष्ट्रवादी-एक आणि कॉंग्रेस-एक याप्रमाणे महिला उमेदवार रिंगणात असून महिला उमेदवार असलेल्या प्रभागात चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे.
इतर बातम्या-