औरंगाबाद: कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात उत्साहाचे (Ganesh Festival, Aurangabad) वातावरण दिसून आले. सर्व निर्बंधांचे पालन करत शक्य होईल, तेवढे उपक्रम गणेश मंडळांतर्फे घेण्यात आले. तसेच घरोघरीही बाप्पांचे यथासांग आणि जल्लोषात पूजन करण्यात आले. आता रविवारच्या गणपती विसर्जनाच्या दिवशीदेखील नागरिकांनी पर्यावरण आणि सामाजिक आरोग्याची काळजी घेतच बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहन औरंगाबाद महापालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) करण्यात येत आहे. बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली जाते. यंदाही 11 ठिकाणी विहिरींची साफ-सफाई करून ज्या विहिरीत पाणी नसेल तिथे पाणी टाकत, ही व्यवस्था करण्यात आली. कोरोना काळात नागरिकांनी थेट विसर्जन विहिरींवर न जाता विविध झोनमध्ये नियोजित मूर्ती संकलन केंद्रांवरच मूर्ती जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका एकत्रितपणे गणेशमूर्तींचे विसर्जन करेल, असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे.
संपूर्ण गणेशोत्सव आणि गौरींच्या उत्सवात जमलेले निर्माल्य स्वीकारण्याची व्यवस्थाही महापालिकेने केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्यदेखील विहिरींमध्ये न टाकता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे जमा करावेत. निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार केले जाणार आहे.
महापालिकेने झोन निहाय गणेश मूर्तींची संकलन केंद्रे नियोजित केली आहेत. ती पुढीलप्रमाणे
झोन 1– खडकेश्वर महादेव मंदिराजवळ, माजी नगरसेवक श्री पांडे यांच्या घराजवळ बेगमपुरा, संत विश्राम बाबा शाळेजवळ नंदनवन कॉलनी, वाणी कॉम्प्लेक्स जवळ पढेगाव, गांधी पुतळ्या जवळ.
झोन 2– शहागंज चमन,गुलमंडी पार्किंग,सावरकर चौक, समर्थनगर.
झोन 3- साखरे मंगल कार्यालय समोर,पोलीस कॉलनी सभागृह जवळ.
झोन 4- शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल जेल समोर जाटवाडा रोड,स्मृतिवन गार्डन जवळ हर्सूल तलाव,एसबीओ शाळेजवळ मयुर पार्क.
झोन 5- रामलीला मैदान एन 7,राजीव गांधी मैदान एन 5,चिकलठाणा आठवडी बाजार,गरवारे स्टेडियम.
झोन 6- मुकुंदवाडी बस स्टॉप ,कामगार चौक एन 2 ,डॉ आंबेडकर चौक चिकलठाणा,रामनगर चौक एन 2 सिडको.
झोन 7- कॅनॉट गार्डन परिसर टाऊन सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा, विजयनगर चौक,सूतगिरणी चौक,विसर्जन विहीर शिवाजी नगर,हनुमान चौक,हनुमान नगर पाणी टाकी जवळ,रिद्धी सिद्धी हॉल समोर उल्का नगरी.
झोन 8- 106 कंचनवाडी/नक्षत्रवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, 110 मयूरबन कॉलनी ,जबिंदा लॉन्स जवळ,114 देवळाई चौक देवळाई, 114,115 देवळाई सातारा,रेणुकामाता मंदिर कमान, 115 सातारा ,सातारा मुख्य गाव विसर्जन विहीर.
झोन 9- ज्योतिनगर अंतर्गत पाण्याच्या टाकी जवळ,क्रांती चौक अंतर्गत संत एकनाथ रंग मंदिर,उस्मानपुरा, रेल्वे स्टेशन मुख्य रस्ता कर्णपुरा
(Special Arrangement done by Aurangabad Municipal corporation for Ganesh idol visarjan ceremony)
इतर बातम्या-